भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे नवे सरकार सत्तेवर आल्यास 29 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याची सर्वाधिक काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागली आहे असे दिसते. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतके मंत्री कारभार करत असल्याची उदाहरणे अन्य राज्यांमध्येही कमी नाहीत. मुद्दा मंत्रिमंडळाच्या आकाराचा नसतो तर सत्ताधार्यांच्या कार्यक्षमतेचा असतो. शिवसेनेत …
Read More »मालमत्ता कराचा भरणा करा आणि शास्तीवर 75 टक्के सवलत मिळवा!
पनवेल मनपातर्फे आवाहन पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेने सिडको हद्दीतील मालमत्ताधारकांना 31 जुलैपर्यंत शास्तीवरती 75 टक्के सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले असून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. या आधीही महापालिकेने मालमत्ता करामध्ये भरघोस सवलत दिली …
Read More »मासेमारीसाठी बंदरात सज्जता
मच्छीमार बोटींवर खलाशांची लगबग; कामांना वेग उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर दोन महिन्यांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरल्याने बंदरांमध्ये मच्छीमारांची विविध कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजननाचा असल्याने 1 जूनपासून पुढील 60 दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत …
Read More »गावठी दारूच्या धंद्यांना आळा घाला
मुरूडमधील आदिवासी महिलांचे तहसीलदारांना निवेदन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत बेलीवाडी आदिवासी भागात गावठी दारूचे धंदे तेजीत असून त्याचा नाहक त्रास तेथील आदिवासी महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कर्ते पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याने दारूचे धंदे बंद करावेत, अशी मागणी बेलीवाडी परिसरातील महिलांनी निवेदनाद्वारे तहसीलदार …
Read More »राष्ट्रपतींचा अपमान ः काँग्रेसविरोधात भाजप आक्रमक
देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्या -अश्विनी पाटील पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने देशातील महिलांचा, समृद्ध परंपरा …
Read More »सिकेटी महाविद्यालयात महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात (सिकेटी) मेडिकव्हर हॉस्पिटल, भारतीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते झाले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू …
Read More »शिंदे समर्थक रुपेश पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला
उरण ः रामप्रहर वृत्त आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला झटका दिल्याचा राग मनात धरून अज्ञातांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थक रुपेश पाटील यांच्या उरण येथील कार्यालयावर भ्याड हल्ला करीत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला व ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसेनेचे खासदार, आमदार, …
Read More »मच्छिमार बोटींवर खलाशांची लगबग
करंजा-मोरा-कसारा ससून डॉक बंदरात सज्ज होतायेत बोटी उरण : प्रतिनिधी शासनाच्या खोल समुद्रातील 60 दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. आता अवघ्या दोन दिवसांचाच अवधी उरल्याने मासेमारीच्या पूर्वतयारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससून डॉक बंदरात मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे. खोल समुद्रातील मासेमारी 50 ते 60 वाव खोलीपर्यंत …
Read More »पालीत भव्य हिंदू जनजागृती रॅली
तहसीलदारांना मागणीचे निवेदन पाली : प्रतिनिधी समस्त सुधागडमधील हिंदू बांधवांच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) पालीमध्ये हिंदू जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले. या रॅलीत सुधागडसह पेण, रोहा तालुक्यातील हिंदू बांधव, विशेषतः युवक मोठ्या …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर मिनीबस घसरली
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खालापूरजवळ हॉटेल रिंकीसमोर गोरेगाव मुंबई येथून लोणावळा येथे वर्षा सहलीसाठी जाणारी मिनीबस घसरून पलटी झाली. शुक्रवारी (दि. 29) संध्याकाळी झालेल्या या अपघातात मिनीबसमधील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वर्षा सहलीसाठी पर्यटकांना घेऊन मिनीबस गोरेगाव मुंबई येथून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper