बिल्डरांना बनावट परवानग्या देणे भोवले पनवेल ः वार्ताहर उसर्ली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरांना बांधकामासाठी अनधिकृत परवानग्या देणारे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्या बिल्डरांचेही धाबे …
Read More »पोलादपूर तालुक्यात ’वलगण’ आली!
चढणीचे मासे पकडण्यासाठी मत्सप्रेमींची लगबग पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडून नाल्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागली असून या नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणार्या माशांची वलगण लागली आहे. ही वलगनीची मासळी पकडण्यासाठी ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यात सावित्री, कामथी, घोडवनी, …
Read More »मुसळधार पावसाने सुधागड तालुका जलमय
पालीत अंबा नदीचा रूद्रावतार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालीतील अंबा नदीने बुधवारी (दि. 6) धोक्याची पातळी ओलांडली होती. अतिवृष्टीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढल्याने वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलांना नदीच्या पाण्याने स्पर्श केला. काही तास सलग …
Read More »डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त रोह्यात रक्तदान शिबिर
धाटाव : प्रतिनिधी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा फाउंडेशन, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान व जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 43 रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा …
Read More »माथेरानमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत
कर्जत : बातमीदार माथेरान परिसरात पावसाळ्यात होणार्या आपत्कालीन घटनांवर तात्काळ कार्यवाही करता यावी, यासाठी नगर परिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. पावसाळ्यात माथेरान परिसरात झाडे कोसळणे, भुस्खलन होणे, दरडी कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे, आदी घटना घडत असतात. काहीवेळा घोड्यांचे होत असतात. अशावेळी मान्सून आणि आपत्तीच्या घटनांची माहिती मिळावी …
Read More »कशेडी घाटात पुन्हा दरड कोसळली
धामणदिवी येथे महामार्गावर लाल मातीचे ढिगारे पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदिवी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 5) सायंकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एका मार्गिकेवरून सुरू होती. दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कशेडी टेप वाहतूक पोलीस कक्षाचे उपनिरीक्षक चांदणे यांनी दिली. कशेडी घाटात सोमवारी …
Read More »कर्जतमध्ये पावसाची संततधार
पालिका प्रशासन सतर्क, आपत्ती व्यवस्थापन संस्थांकडून आढावा कर्जत : बातमीदार मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने कर्जत नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. कर्जत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत आहे. …
Read More »रायगड जि.प., पं.स.चा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आपापल्या क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती-जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. सर्व ठिकाणी …
Read More »रायगडात पावसाचा जोर कायम; पोलादपूरमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल
महाड : प्रतिनिधी संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर बुधवारी (दि. 6)देखील कायम होता. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली असून एनडीआरएफचे महाडमध्ये आलेले आणखी एक पथक पोलादपूर येथे पाचारण करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे महाडकर नागरिकांमध्ये भय …
Read More »उद्धव ठाकरेंनी प्रति’मातोश्री’ तयार केली : आ. भरत गोगावले
मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी प्रति‘मातोश्री’ तयार केली आहे त्यामुळे त्यांच्या मातोश्रीवर आम्ही जाऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसंदर्भात भाष्य केले. आमदार गोगावले म्हणाले, ‘मातोश्री’ हे ठिकाण बाळासाहेब …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper