Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना खुषखबर!

वेतनवाढीचा महासभेत निर्णय पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जानेवारी 2022पासून वेतनवाढ मिळणार आहे. शहरातील रस्त्यावर असलेली बेवारस व सोडून दिलेली वाहने महापालिका उचलून नेणार असल्याने आता शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग ’क’ कामोठे येथे प्रभाग कार्यालय बांधण्यास आणि चारही प्रभागांतील  विविध विकासकामांना बुधवारी …

Read More »

पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना टोल माफ

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकर्‍यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकरी दिंड्यांवर जास्त लक्ष द्या, …

Read More »

दरडबंदीऐवजी घाटबंदीचा अजब उपाय

पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट आणि आंबेनळी घाट तसेच कुडपण घाट, चिपळूण खेडदरम्यानचा रघुवीर घाट आणि परशुराम घाट, महाड तालुक्यातील वरंध, भोरघाट दरडी कोसळण्यावर प्रतिबंध न झाल्याने बंद होऊ घातले आहेत. दरडबंदीचे उपाय करण्याऐवजी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू कामातून …

Read More »

स्वागताच्या तुतार्या

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे चतुरस्र नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार अजुन पूर्णत्वाने स्थापन व्हायचे आहे. तरीही या नव्या सरकारच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जल्लोश करताना दिसत आहेत. आठवडाभरापूर्वी ज्यांना पळपुटे बंडखोर असे हिणवले …

Read More »

महाडमधील जमिनीला पडलेल्या भेगेची भूवैज्ञानिकांकडून पहाणी

प्राथमिक तपासांती कोणताही धोका नसल्याची माहिती अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी बावळे गाव परिसराला भेट …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे गव्हाण विभागातील विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 5) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. …

Read More »

कोरोना काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांना पनवेल मनपातर्फे अर्थसहाय्य

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन पालक गमावलेल्या 21 वर्षाखालील 128 बालकांना प्रत्येकी 50 हजारांचे अर्थसहाय्य वाटप मंगळवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई …

Read More »

आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावलेंकडून चोळई येथील दरडग्रस्त भागाची पाहणी

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त चोळई येथे आमदार प्रवीण दरेकर आणि भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि. 5) भेट देऊन पाहणी केली. या भागात तातडीने मदत देण्याचे निर्देश आमदारद्वयीने दिले तसेच येथील स्थानिक नागरिकांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांना सर्वार्थ मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन, प्लेसमेट सेल, समुपदेशन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) सकाळी 10 ते 4 या वेळेत कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी अ‍ॅक्सीस बँकेचे सर्व …

Read More »

रायगडात जोरदार पाऊस; सखल भागांत पाणी साचले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मंगळवारी (दि. 5) सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणार्‍या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीदेखील दिवसभर अधूनमधून …

Read More »