Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्य आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेची पारितोषिके जाहीर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निकाल घोषित पनवेल : रामप्रहर वृत्तशैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 18, 19 आणि 20वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण फाटा येथे उड्डाणपुलाचे लोकार्पण

उरण : रामप्रहर वृत्तउरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गव्हाण फाटा येथे उड्डाणपूल साकारण्यात आला आहे. उरण, पनवेल आणि उलवे या शहरांना जोडणार्‍या या पुलाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 19) लोकार्पण झाले. या …

Read More »

काँग्रेसच्या जीवावर मोठा होऊन फणा काढणार्‍याला चिरडून टाकू

माणगावात वडेट्टीवारांचा खासदार तटकरेंवर निशाणा माणगाव : प्रतिनिधीकुणबी समाजोन्नती संघाच्या मुंबई येथील वसतिगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मी माझ्या खात्यामार्फत दिला, मात्र बॅनरवर फोटो दुसर्‍यांचे लागले. काँग्रेसच्या जीवावर मोठा होऊन कुणी फणा काढीत असेल, तर त्याला चिरडून टाकण्याची ताकद निश्चितच काँग्रेसमध्ये आहे, असा टोला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘दिबां’च्या नावाचा लढा सुरूच राहणार !

पनवेलमधील बैठकीत प्रकल्पग्रस्त समितीचा राज्य सरकारला गर्भित इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त‘दिबां’चे नाव भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत लढा कायम राहील, त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका प्रकल्पग्रस्त समितीने घेत राज्य सरकारला गर्भित इशाराही पनवेलमध्ये झालेल्या बैठकीतून …

Read More »

पीक विमा हप्त्याची रक्कम कमी करावी

सुधागडमधील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन पाली : रामप्रहर वृत्त पीक विमा योजने अंतर्गत नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळावी. तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम गेल्या वर्षी एवढीच करावी, अशी मागणी सुधागड तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. किसन सन्मान शेतकरी गटाच्या वतीने या मागणीचे निवेदन बुधवारी (दि.18) तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी गणपत सितापराव, निलेश …

Read More »

महाडजवळ कारची डंपरला धडक; दोन जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एका डंपरवर गुरुवारी (दि. 18) संध्याकाळी एक कार आदळली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले. महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. तेथे सिमेंटने भरलेला डंपर (एमएच-46,बीएफ-1551) उभा होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास …

Read More »

पेण दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील विजयी झाले. त्यांनी शेकाप उमेदवारचा पराभव केला. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. उपसरपंच पदासाठी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील आणि शेकापच्या नंदिनी संतोष जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदस्यांच्या मागणीनुसार यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले. रवींद्र  …

Read More »

रायगडात हमीभाव भात खरेदी केंद्र उघडणार

जिल्हाधिकार्‍यांचा अद्यादेश; भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात विविध 40 ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत भाताची ऑनलाइन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एक ऑक्टोबर रोजी …

Read More »

मोबाइलच्या दुकानातून लाखोंचा ऐवज चोरी

पनवेल : वार्ताहर घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी सीवूड्स सेक्टर-4ए मधील जिओ स्टोअर या मोबाइल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाइल फोन व इतर वस्तू असा तब्बल 12 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. एनआरआय पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  …

Read More »

नवी मुंबईत मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध करण्यात येणार्‍या विधानसभानिहाय मतदार यादीनुसार नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याने या कार्यक्रमाबाबतची माहिती देणे व जनजागृती करण्याकरिता …

Read More »