खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथे रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. एलिझावेथ मश्युज् उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून उपस्थितांचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला.प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, …
Read More »व्यवसायाच्या निमित्ताने दोन लाखांची फसवणूक
पनवेल : बातमीदार व्यवसायाकरिता घेतलेले 2 लाख रुपये परत न केल्या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती चिंतू भोपी (नावडे) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून आरोपी यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. आरोपी नेहा सुदेश शिंदे व सुदेश शिंदे यांनी व्यवसायाकरीता 2 लाख रुपये घेतले होते. सदरची …
Read More »धाडी समाजाचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशाचप्रकारे रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत राहणार्या धाडी समाजाच्या रहिवाशांनी रविवारी (दि. 24) सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्मशानभूमी स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक हवामान दिनाचे औचित्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 24) स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यास श्रीसदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते. त्यापुढे जाऊन रविवारी श्रीसदस्यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी …
Read More »क्रिकेट स्पर्धेचे सोनारीत उद्घाटन
उरण : वार्ताहर रायगड जिल्ह्यात टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते. मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पनवेल, उरणमधील अनेक खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे यापुढे याच मैदानावर सिजन क्रिकेटचे आयोजन करावे, जेणेकरून येथील खेळाडूंना चांगले नाव कमवता येईल, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. …
Read More »भारतीय जनता पार्टीत प्रवेश
पनवेल : रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईमध्ये राहणार्या धाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सिडको अध्यक्ष तथा रायगड भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
Read More »होळीची धुंदी नडली; पोलिसालाच केली धक्काबुक्की
पनवेल ः वार्ताहर संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विशेषतः कोकणातील होळीचा सण व शिमगोत्सवाचा जल्लोष सातासमुद्रापार जाऊन पोहचला आहे. मोठी होळी झाली की दुसर्या दिवशी धूळवड असते. धूळवडीच्या दिवशी प्रामुख्याने मुंबईपासून पनवेलपर्यंतचा परिसर रंगपंचमी साजरी करतो, मात्र महाराष्ट्रात त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. …
Read More »पनवेल तालुक्यात श्रीसदस्यांचे स्मशानभूमी स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्ह्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले गेले होते. प्रतिष्ठानच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते, पण रविवारी मात्र श्रीसदस्यांनी रायगड जिल्ह्यात स्मशानभूमीची स्वच्छता करीत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला …
Read More »तालुका भाजप सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका मंडल अंतर्गत सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या रविवारी जाहीर करण्यात आल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्ती झालेल्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्र प्रदान केले. पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सिडको अध्यक्ष तथा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता …
Read More »ग्रा.पं. मतदानाला प्रतिसाद
चिपळे, कुंडेवहाळ, कर्नाळ्याचा आज लागणार निकाल पनवेल : बातमीदार तालुक्यातील चिपळे, कुंडेवहाळ आणि कर्नाळा या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) उत्साहात मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार 75 ते 80 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सूचित करण्यात आले. सदस्यपदाच्या उमेदवारांपैकी 3 ग्रामपंचायतींचे एकूण 9 उमेदवार याअगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper