पनवेल : बातमीदार : धरणा कॅम्प, तळोजा येथे चोरट्यांनी दीड लाखांची घरफोडी केली आहे. तळोजा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन नारायण शेगर (वय 35) हे एका कंपनीमध्ये काम करत असून त्यांचे मालक हे राजस्थान येथे गेले असल्याने ते भंडार्ली येथे कंपनीमध्येच काही दिवसांसाठी राहण्यास गेले होते. त्यामुळे त्यांच्या …
Read More »उरणमध्ये राजस्थान वैष्णव मित्र मंडळाचा होळी महोत्सव
उरण : वार्ताहर : उरण येथील राजस्थान वैष्णव मित्र मंडळातर्फे होळी महोत्सव 2019चे आयोजन संस्थापक अध्यक्ष महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि. 22) मार्च रोजी सायंकाळी 6 ते 10पर्यंत उरण एज्युकेशन सोसायटी स्कूल बोरी, उरण येथे करण्यात आले होते. सुमारे तीन हजार राजस्थान वैष्णव समाजाचे बांधव व मित्र परिवार या …
Read More »मत्स्यदुष्काळाने मच्छीमार हैराण
बोटीवर लावण्यासाठी मोठा मासाही नाही सापडला उरण : रामप्रहर वृत्त : समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा सामना करीत आपला मासेमारी व्यवसाय करणार्या मच्छीमारांकडून समुद्राच्या उसळत्या लाटांचा सामना करीत कुटुंबीयांसह उत्साहात होळी साजरी करण्यात येते, मात्र या वर्षी पडलेल्या मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले. बोटीवर लावण्यासाठीही मोठा मासा मिळाला नसल्याची खंत …
Read More »सुनील तटकरे यांचे मधू ठाकूरांपुढे लोटांगण
अलिबाग : प्रतिनिधी सुनील तटकरे यांना अलिबागेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भीमगर्जना करणार्या काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर यांना गळाला लावण्यात राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यशस्वी झाले असून, गुरुवारी धूळवडीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने अलिबागेत आलेल्या सुनील तटकरे यांनी पापांपुढे चक्क लोटांगण घालत निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दोन …
Read More »सुयश ठाकूर यांचा वाढदिवस
पनवेल ः भाजपचे युवा नेते सुयश ठाकूर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष जितेंद्र घरत, अध्यक्षा समिरा चव्हाण, दीपक दुर्गे, अशोक आंबेकर यांनी सुयश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Read More »इमरान खान यांचा वाढदिवस
पनवेल ः भाजपचे नवीन पनवेल अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष इमरान खान यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी इमरान खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अमन अख्तर, सदस्य हैदर अली आदी उपस्थित होते.
Read More »चिंध्रणमध्ये सरपंच, ग्रामस्थ चषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त रोशन साई स्पोर्ट्स चिंध्रणच्या वतीने ‘सरपंच व ग्रामस्थ चषक 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या चषकांतर्गत प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सरपंच व ग्रामस्थ चषकाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. चिंध्रण येथे रोशन …
Read More »गाढी नदीकिनारी आगळेवेगळे कविसंमेलन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे एका आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य कलामंच पनवेलतर्फे गाढी नदीकिनारी निसर्गाच्या सान्निध्यात हे कविसंमेलन रंगले. या वेळी अध्यक्षस्थानी माजी कारागृह अधीक्षक संजय जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक ज्येष्ठ साहित्यिक गजलकार रोहिदास पोटे होते. या संमेलनामध्ये नवकवींनी आपल्या …
Read More »स्वच्छता अभियान, सर्वेक्षण, पथनाट्य कार्यक्रम यशस्वी
पनवेल : वार्ताहर शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल आणि अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान, सर्वेक्षण आणि पथनाट्य या कार्यक्रमाचे आयोजन बीएड् महाविद्यालय पनवेल येथे करण्यात आले होते.
Read More »योग आहारच्या वतीने मोफत योगा शिबिर
उरण ः दिनेश पवार : येथील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योग आहारच्या वतीने शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मनोज गॅलेक्सी नागाव (म्हतावली) येथे महिलांसाठी मोफत योग शिकविण्यात आला. योग ट्रेनर प्राजक्ता सरवैया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या रोजच्या आहाराविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी विचारलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper