पनवेल : बातमीदार शुक्रवारी मध्यरात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास ऑइल घेऊन जाणार्या ट्रकचालकाची मद्यधुंद अवस्था पाहून टोलनाक्यावरील कर्मचार्यांनी ट्रक बाजूला लावण्याबाबत समजावत असताना, मद्यधुंद ट्रकचालकाने कसलाही विचार न करता समोर उभ्या असलेल्या कर्मचार्यांमधून तडक निघण्याचा प्रयत्न केला, मात्र या वेळी येथील सुपरवायझर असलेल्या एकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली …
Read More »‘रोटरी’तर्फे पनवेल येथे चला मुलं घडवूया उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या आगरी समाज हॉल, पनवेल येथे ’चला मुले घडवूया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास बालरोगतज्ज्ञ व रायगड भूषण डॉ. चंद्रशेखर दाभाडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी मुलांना समजून घेऊन त्यांच्या छोट्या छोट्या समस्या वेळीच समजून …
Read More »चेन स्नॅचिंग करणार्या अट्टल गुन्हेगाराला अटक
पनवेल : वार्ताहर खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातलेल्या मोहम्मद ईसरार खान (37) या अट्टल सोनसाखळी चोराला पकडण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. तो खारघरमधील शिल्प चौकातून एका महिलेचे दागिने खेचून पळून जात असल्याचे समजल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक संतोष भोकरे व पोलीस शिपाई लवकुश शिंगाडे या दोघांनी …
Read More »बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बेलवली येथे जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) करण्यात आले. उद्घाटन समारंभाला पनवेल पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच भरत पाटील, संजय गायकर, …
Read More »रात्रीस खेळ… चाले हा…
नितीन देशमुख : पनवेल – दो भेल देना’, ‘एक भेल… कांदा टमाटर जादा’ …एकामागोमाग एक ऑर्डर्स सुरू असतात. भेळवालाही सगळे जिन्नस एकत्र करून झटपट भेळेची पुडी तयार करून देत असतो. मुंबईतल्या जवळपास सगळ्या रेल्वेस्थानकांमध्ये संध्याकाळच्या वेळी हे चित्र दिसून येऊ लागलंय. भेळेला अचानक एवढी मागणी येण्याचं कारण डाएटच्या बाबतीत मुबईकरांमध्ये …
Read More »पनवेल, उरण, कर्जतच्या मतदारांवर मावळची मदार
उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचा खासदार हे तीन विधानसभा मतदारसंघ ठरवणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी 2008मध्ये राज्यात मावळ हा एक नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचवड …
Read More »‘अफाट’ लोकप्रिय असलेल्या कांती कडूंना आता पनवेल विधानसभेची उमेदवारी द्या!
जनतेची एकमुखी मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त खरे पाहता आयुष्यभर खस्ता खात केलेल्या (तथाकथित) समाजकार्यामुळे प्रसिद्ध ठरलेल्या कांती कडू हे 2006 साली झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला, तसेच 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहू न शकल्यामुळे पनवेलकर या अफाट लोकप्रियता लाभलेल्या लोकप्रतिनिधीला मुकले. केवळ त्यामुळेच प्रशांत ठाकूर हे नगराध्यक्ष …
Read More »रायगड जिल्ह्यात युतीच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाइं युतीच्या प्रचाराचा शुभारंभ पनवेल येथे दोन्ही पक्षांतील प्रमुख नेतेगणांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 16) धडाक्यात करण्यात आला. या वेळी बोलताना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी जोमाने कामाला लागावे, असे निर्देश दिले. राज्यात युतीचा निर्णय झाल्यानंतर रविवारी प्रथमच …
Read More »प्रवीण सावंत यांना शुभेच्छा!
पनवेल : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल तालुका चिटणीस प्रवीण सावंत यांना जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »ज्येष्ठ कार्यकर्ते धर्मा काकडे यांना शुभेच्छा!
पनवेल : आदई ग्रामपंचायत पाणीपुरवठा आणि स्वच्छता कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते धर्मा काकडे यांना युवा कार्यकर्ता शेखर शेळके, उपसरपंच योगेश पाटील सदाशेठ पाटील, बांबु ऑफिस ग्रुप आणि ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper