पनवेल : वार्ताहर ठाणे येथून कळंबोली येथील रेल्वे यार्डमध्ये जाणार्या 12 चाकी बल्कर ट्रकच्या पाठीमागील चाकामध्ये आल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावर फुडलँड कंपनीजवळ घडली. कळंबोली पोलिसांनी या अपघातातील ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून राजपत्रात त्याला ताब्यात घेतले आहे. नालासोपारा येथे राहणारा ट्रकचालक राजेश यादव हा रविवारी …
Read More »उत्तरप्रदेशात खून करून फरार झालेल्या चौघांना खारघरमध्ये बेड्या
पनवेल : वार्ताहर उत्तरप्रदेश राज्यातील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीचा खून करून चार आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने खारघर येथून शिताफीने अटक करून त्यांना गुन्हयाच्या पुढील तपासकामी देल्हूपूर पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील जिल्हा प्रतापगढ मधील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत …
Read More »राज्यस्तरीय तायक्वांदो पुमसे स्पर्धेत रायगडला सांघिक अजिंक्यपद
मोहोपाडा : प्रतिनिधी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने अहमदनगर येथे आयोजित राज्यस्तरीय पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने एकूण 21 पदके मिळवून 1931 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध वयोगटांमधील सुमारे 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सब-ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर व सीनिअर अशा वयोगटांत वैयक्तिक पुरुष व महिला, मिश्र …
Read More »उरणच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटेत अभिवादन
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त सन 1984मध्ये उरण तालुक्यात झालेल्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना मंगळवारी (दि. 17) भाजपचे रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पागोटे येथे अभिवादन केले. या वेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली तसेच हुतात्मा …
Read More »वाढत्या नागरीकरणासाठी तिसरी मुंबई आवश्यक
नवी मुंबईचे वाढते औद्योगीकरण, नैना प्रोजेक्ट यामुळे वाढणारे नागरीकरण यामुळे मुंबईसह नवी मुंबईवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पनवेल महापालिका 2016 मध्ये अस्तित्वात आली. या तिन्ही महापालिकांवर वाढत्या नागरिकरणामुळे पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे जिकरीचे झाले आहे. लवकरच सुरू होणार्या विमानतळामुळे त्यात भरच पडणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने जानेवारी …
Read More »खारघर मॅरेथॉन : विविध स्पर्धांना प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’खारघर मॅरेथॉन 2023’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या.एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये राजश्री सुर्वे यांनी प्रथम क्रमांक, …
Read More »किक-बॉक्सिंग स्पर्धेत रसायनीतील खेळाडू चमकले
मोहोपाडा : प्रतिनिधी रामकृष्णा अकॅडमी व हरिग्राम केवाळे व्हिलेज यांच्या वतीने जिल्हास्तरावर किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहोपाडा, रसायनीतील खेळाडूंनी सहभाग घेत सुयश संपादन केले आहे. रसायनीतील किक बॉक्सिंग प्रशिक्षक संजय काशिनाथ पाटील व त्यांच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि पाच रौप्यपदके पटकाविली. यात वेदांत सोनावणे, अजय जाधव, …
Read More »मर्दानी स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप; पनवेलच्या खेळाडू व पंचांचे सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन व मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पंच परीक्षा व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पनवेलमधील खेळाडू आणि पंचांनी यश संपादन केले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व इंडियाच्या चेअरमन …
Read More »नवी मुंबईत हवा प्रदूषणाचा विळखा
रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडथळे नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याच समोर आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येत असून, रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या खारघर पूर्व मॅरेथॉन स्पर्धांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन 2023 ही स्पर्धा आयोजित केली आहे. खारघरमधील महाविद्यालयात विविध स्पर्धा घेतयल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा 10 ते 16 जानेवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper