Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

अलिबाग-विरार कॉरिडॉर भूसंपादनाची माहिती द्यावी

बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन उरण : प्रतिनिधी अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गासाठी होणार्‍या भूसंपादनाबाबत उरण तालुक्यातील शेतकर्‍यांसोबत संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित करून सविस्तर माहिती देण्याबाबत अलिबाग-विरार कॉरिडॉरबाधीत शेतकरी संघर्ष समितीमार्फत पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके व एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर, खजिनदार …

Read More »

विकासकामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 मधील विविध विकासकामांची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) केली. जनकल्याण बँक समोरील रस्ता, गावदेवी पाडा, म्हात्रे हॉस्पिटल आणि तथास्तु हॉल या परिसरामध्ये सुरू असलेल्या रस्ते आणि नाल्यांच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली आणि …

Read More »

फसवणूक करणारी टोळी गजाआड

11 जणांना अटक; 10 लाखांचे दागिने, घातक शस्त्रांसह 89 एटीएम कार्ड हस्तगत पनवेल ः वार्ताहर ज्येठ नागरिकांना एकटे गाठून बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम फसवणूक करणार्‍या तीन गुन्हेगारांना व एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याचा पिन नंबर जाणून घेऊन हातचलाखीने एटीएमची अदला-बदल …

Read More »

तळोजा रोहिंजण भागातून घुसखोर बांगलादेशी अटक

पनवेल : वार्ताहर तळोजा येथील रोहिंजण परिसरात बेकायदेशीररीत्या वास्त्यव्यास असलेल्या सात घुसखोर बांगलादेशी नागरिकांना तळोजा पोलिसांनी अटक केली. यात महिला चार महिला तीन पुरुषांचा समावेश आहे. सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोल-मजुरी, घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तळोजा गाव फेस-1 व 2, खुटारी गाव, …

Read More »

उलवे नोडमध्ये साकारतेय गणेश मंदिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळ उलवे आणि शेलघर ग्रामस्थांच्या माध्यमातून उलवे नोड सेक्टर 16 येथे श्री गणेश मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या …

Read More »

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी केला आहे. …

Read More »

पनवेलमध्येही भाजप स्थापना दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन पनवेलमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे संबोधित केले. त्या अनुषंगाने पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात या संवाद कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन …

Read More »

शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून बुधवारी (दि. 6) शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या शेलघर येथील शाळेपासून ते सुनील भगत यांच्या घरापर्यंत आणि पुढे कातकरी वाडी इथपर्यंत ही पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमधील मिठास दुकानाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त तक्का सिग्नलजवळ नव्याने मिठास स्वीट कॉर्नर हे दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) उद्घाटन झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या. पनवेल शहरातील तक्का सिग्नल जवळ सोमनाथ …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान

मान्यवरांची उपस्थिती; विविध कार्यक्रमांची रेलचेल पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जिवाचीही पर्वा न करता सेवा कार्य करणार्‍या कोरोना योद्धांचा सन्मान सोनिया महिला मंडळाने केला आहे. मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. 5) आयोजित करून तब्बल 87 …

Read More »