Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सीकेटी विद्यालयात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात गुरुवारी (दि. 16)साजरा करण्यात आला. त्यामध्ये अमृत महोत्सवाचा 75 वा स्तंभ विद्यार्थ्यांनी उभारला. त्यामुळे हा स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये सर्वांसमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा …

Read More »

मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन

सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये असलेल्या मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू

पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोनामुळे बंद असलेले पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग शासनाच्या आदेशानुसार अखेर उघडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातही बुधवारी (दि. 15) हे वर्ग भरले. पनवेल परिसरात महापालिका आयुक्त गणेश देशमुख, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी विविध शाळांमध्ये जाऊन गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आयुक्तांनी रयत शिक्षण …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटलांची जामिनावरील सुनावणी आता 23 डिसेंबरला

पनवेल ः रामप्रहर वृत्त बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 15) झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंचे वकील उपस्थित होते. ईडीतर्फे विशेष सरकारी गोन्सालवीस …

Read More »

विक्रांत पाटील यांनी गोविंद गार्डन सोसायटीसाठी बनविला काँक्रीट रॅम्प

पनवेल : वार्ताहर प्रभाग 18 मधील स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रीटीकरण होऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण आद्यपही या मार्गावरील दुतर्फा स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम झालेले नाही. त्यामुळे स्वामी नित्यानंद मार्गालगतच्या सोसायट्यांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याची उंची वाढल्यामुळे सोसायट्यांमध्ये जाणार्‍या रस्त्याला उतार जास्त प्रमाणात होता. त्यामुळे दुचाकी आणि छोट्या …

Read More »

‘सीकेटी’च्या दोन एनसीसी कॅडेट्सची दिल्ली राजपथावरील संचलनासाठी निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, न्यू पनवेलच्या राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभागाचे सिनियर अंडर ऑफिसर अनुज धरमसिंह रणवा आणि सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी राजेंद्र धाडगे यांची दिल्ली येथे होणार्‍या प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात 10 लाखांहून अधिक चाचण्या पूर्ण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात राहण्यासाठी चाचण्यांवर नेहमीच भर दिला असून पालिकेने आतापर्यंत 10 लाखांहून अधिक चाचण्या महापालिका क्षेत्रात केल्या आहे. नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चाचण्यांसाठी सहकार्य करावे, तसेच कोरोनापासून संरक्षणासाठी लसींचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. कोरोनाच्या …

Read More »

कळंबोली येथे मोफत नेत्रचिकित्सा व चष्मेवाटप शिबिर

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील भाजपच्या कार्यालयामध्ये भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मेवाटप शिबिर आयोजित केले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये 280 नागरिकांनी डोळे तपासणी करून घेतली. या शिबिराचे उद्घाटन कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी केले. शिबिराच्या सांगता समारंभाच्या वेळी …

Read More »

खाजगी दवाखाने आणि पॅथॉलॉजी लॅब धारकांची बैठक

पनवेल : प्रतिनिधी साथरोगाबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जनरल प्रॅक्टिशनर आणि पॅथॉलॉजी लॅबची माहिती महापालिकेकडे असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जनरल प्रॅक्टिशनर आणि पॅथलॉजी लॅब असोशिएशनच्या प्रतिनिधींची बैठक डॉ. अरुणकुमार भगत, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी  यांच्या उपस्थितीत महापौर दालनात घेण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत …

Read More »

उरण महाविद्यालयात ‘जागृत ग्राहक व स्मार्ट गुंतवणूकदार’ या विषयावर व्याख्यान

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने ‘जागृत ग्राहक व स्मार्ट गुंतवणूकदार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे टी. आर. पांडे यांनी ‘ग्राहकवाद’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसर्‍या …

Read More »