पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचार्यांनी दुसर्या लाटेपूर्वी कोरोना प्रतिबंधकाच्या दोनही लसींचा डोस घेतल्याने पनवेल महापालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसर्या लाटेत सुरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसर्या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचार्यांच्या एकूण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे. …
Read More »खारघरमध्ये गायींची चोरी
खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 1 रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचार्यांना धमकावुन गोशाळेतील दोन गायी व दोन बैलांना गुर्हे गुंगीचे औषध देऊन तेथून पोबारा केला. टेम्पोच्या सहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुर्हे चोरली.विशेष म्हणजे या …
Read More »उरणमध्ये दुकानांसाठी नवीन नियमावली
उरण : वार्ताहर मुंबई, नवी मुंबई, पनवेलबरोबरच उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नियमांचे पालन करून नक्कीच कोरोनावर मात करता येईल, असा विश्वास येथील डॉक्टर, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून, दुकानांच्या वेळांबाबत नवीन …
Read More »सर्वांनी खबरदारी घ्यायची वेळ -आयुक्त सुधाकर देशमुख
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आताच्या परिस्थितीमध्ये कुणाला जबाबदार धरण्याची वेळ नाही. सर्वांनी खबरदारी घेण्याची वेळ आहे. सर्व नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या उपाय योजना आपल्या पातळीवर राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. दुसर्या लाटेमध्ये रुग्णांची …
Read More »रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा शेड नगरसेवक नितीन पाटील यांचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांसाठी नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने तात्पुरता निवारा शेड व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणारे रुग्णांचे नातेवाईक या सेवेबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना पिडीत रुग्ण दाखल …
Read More »खारघरमध्ये आधुनिक गॅस शवदाहिनी; नगरसेवक प्रवीण पाटील यांचे प्रयत्न
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर 14 मधील वैकुंठधाममध्ये लवकरच आधुनिक गॅस शवदाहिनी सुरू होणार आहे. त्यामुळे खारघरवासीयांचा नातेवाइकांचा मृतदेह घेऊन पनवेलला जाण्याचा त्रास वाचणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. …
Read More »ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना
पनवेल ः कोरोना रुग्णांना प्राणवायू अर्थात ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणण्याकरिता कळंबोली येथून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी रवाना झाली. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथे भेट देत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.
Read More »हातावर पोट असलेल्यांना खांदेश्वर पोलिसांची मदत
पनवेल : वार्ताहर हातावर पोट असलेल्या गोरगरीब बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे व त्यांचे सहकारी धावले. या बांधवांसाठी त्यांनी गेल्या चार दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ जेवण तसेच मास्कचे वाटप केले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे तसेच शुक्रवार ते सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन कडक पाळण्यात येत असल्याने मोलमजुरी …
Read More »विदेशी मद्यासह महिलेला अटक; पनवेल रेल्वेस्थानकात कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी कोरोना निर्बंधांच्या काळात गोव्याहून विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणार्या महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या क्राईम ब्रांचने पनवेल स्थानकात रविवारी (दि. 18) पहाटे पकडले. या महिलेकडून 40 हजारांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून, तिला राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले. 01134 मंगळुरू एक्स्प्रेस रविवारी पहाटे …
Read More »कबड्डीपटू मयूर कदमचे जोरदार स्वागत
उरण ः वार्ताहर उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे झालेल्या 68व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या संघातून खेळणारा उरण तालुक्यातील बोकडविरा येथील अष्टपैलू खेळाडू मयूर जगन्नाथ कदम याचे गावात जोरदार स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. मूळचा अलिबाग तालुक्यातील तळवली गावचा मयूर बालपणापासून बोकडविरा गावचा रहिवासी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper