पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. तरीही ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी गर्दीबाबतचे नियम पाळले नाहीत त्यांच्यावर महापालिकेने रविवारी कारवाई केली आहे. महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. रविवारी (दि. 28) खारघरमधील …
Read More »दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांना सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे दिवंगत नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे शनिवारी (दि. 27) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत संजय …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात नवीन निर्बंध
उल्लंघन झाल्यास कडक कारवाई पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रविवारी (दि. 28) नवीन आदेश जाहीर केले आहेत. 15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असून नागरिकांनी आदेशांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. त्यांचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, तसेच महानगरपालिकेच्या …
Read More »गव्हाण जिल्हा परिषद समितीची बैठक
भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्तिपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल ग्रामीण मंडळ अंतर्गत गव्हाण जिल्हा परिषद समितीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे येथे रविवारी (दि. 28) झाली. या बैठकीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आदी …
Read More »उरण भेंडखळच्या बीपीसीएल; प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश
उरण : प्रतिनिधी बीपीसीएल प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना सोसायटी बनवून प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीत परमनंट कामगारांचे काम जे बाहेरचे कान्ट्रॅक्ट लेबर्स करतात ते सर्व काम प्रकल्पग्रस्त सोसायटीच्या माध्यमातून करतील असे बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या पाठिंब्याने करण्यात आलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे. उरण …
Read More »विद्यार्थिनींकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्याच्या खेडेगावातील कॉलेजमध्ये शिकणार्या तीन विद्यार्थिनींनी आपल्या दैनंदिन पॉकीट मनीतून बचत केलेल्या पैशातून कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या वाटप करून आदर्श घालून दिला आहे. या तीन तरुणींनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या वह्या वाटपातून गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास उत्साह मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त …
Read More »पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा…
पनवेल : प्रतिनिधी आता पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा… लॉकडाऊनच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो. अलिकडच्या काही दिवसात धार्मिक, कौटुंबिक, सणासुदीच्या कार्यक्रमातही शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन नागरिक करीत नसल्याने पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. 10 मार्च 2020 रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. …
Read More »शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याचे निर्देश
पनवेल : प्रतिनिधी कोविड 19मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून 31 मार्च 2021 रोजी तिथीनुसार होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी …
Read More »पनवेलमध्ये वाढत्या कोरोनामुळे कामगारांना लॉकडाऊनची भीती
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात झालेल्या टाळेबंदीला एक वर्ष पाच दिवस पूर्ण झाले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज 200पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, …
Read More »पनवेलमधील रेस्टॉरंट्स, बारसाठी नवे निर्बंध
पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रेस्टॉरंट्स, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी येथे सायंकाळी 7 वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. याबाबतचे निर्देश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 26) दिले आहेत.महापालिका हद्दीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper