Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

विद्यालयास ग्रंथांची अनमोल भेट

पनवेल ः वार्ताहर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ज्ञानवसा संवर्धित करण्यासाठी, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न म्हणून गुळसुंदे येथील कु. गार्गी रेवती वसंत सोमण यांनी विद्यालयास ग्रंथभेट दिली. आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी अशा विविध विषयांवरील सुमारे सात हजार रुपयांची मराठी …

Read More »

पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः प्रतिनिधी पनवेलकरांचा अभिमान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शहरातील पीर करमअली शहा बाबांच्या दर्ग्यात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे गुरुवारी (दि. 18) 70 फूट फुलांची चादर अर्पण करण्यात येणार आहे.  2 जून रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस …

Read More »

वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दोन दिवसांत खारघर आणि तुर्भे येथे झालेल्या दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक तरुण गंभीर जखमीही झाला. खारघर येथील अपघातातील ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात ऋषिकेश हिवराळे …

Read More »

सराईत चोरटे गजाआड; घरफोडीतील ऐवज हस्तगत

पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात घरफोडीसह एका टेम्पोच्या बॅटरीसह टायर चोरणार्‍या दुकलीस पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरट्यांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून घरफोडीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सुरेखा भेंडे (रा. लाइन आळी, पनवेल) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा उचकटून …

Read More »

चिमुरडीच्या अपहरणकर्त्यांना बेड्या; दोन महिलांचा समावेश

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील नवघर गावातील एका घरातून पळवून नेलेल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोधून काढण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी दोन संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उरण तालुक्यातील नवघरपाडा येथे वास्तव्यास असलेल्या मनोज राजभर यांचा फुलेहारांचा व्यवसाय आहे. सकाळच्या सुमारास व्यवसायात मग्न असलेल्या राजभर …

Read More »

उलवे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल उलवे विद्यालयात सोमवारी (दि. 15) सेवा सहयोग फाऊंडेशन, मुंबई यांच्या सौजन्याने विज्ञान प्रदर्शन झाले. या संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट करून सांगण्यात आल्या. इयत्ता आठवी ते दहावीच्या विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित विविध प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. न्यूटनच्या गतिविषयक …

Read More »

मंजूर विकासकामांच्या निविदा त्वरित प्रसिद्ध करा; भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गावातील व आजूबाजूच्या परिसरातील मंजूर विकासकामांच्या निविदा त्वरित प्रसिध्द करण्यात याव्या, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर डॉ. कविता चौतमोल यांना निवेदन …

Read More »

उरण कोरोनामुक्त करूया!; भाजपचे नागरिकांना आवाहन

उरण : वार्ताहर मुंबई शहराप्रमाणे इतर शहरात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. उरण तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पुढील काळात कोरोनामुक्त उरण करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी नागरिकांना केली आहे. ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे किंवा कोणत्याही व्याधींनी ग्रस्त असल्यास …

Read More »

घारापुरीला सागरी तटबंदी; संरक्षक भिंतीसाठी 37.50 कोटींच्या कामाचा शुभारंभ

उरण : प्रतिनिधी जेएनपीटीच्या 37.50 कोटी खर्चाच्या मंजूर करण्यात आलेले आणि मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या घारापुरी बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या संरक्षक भिंत व सागरी तटबंदीच्या कामाचा शुभारंभ सोमवारी (दि. 15) करण्यात आला. यासाठी आमदार महेश बालदी आणि स्थानिकांनी मागणी केली होती. बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या तटबंदीमुळे समुद्राच्या लाटाने …

Read More »

पनवेल मनपाचा 772.77 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेचा सन 2020-21चा  सुधारित व 2021-22चा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 15) आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांना सादर केला. हा अर्थसंकल्प 772.77 कोटी रुपयांचा आहे. स्थायी समितीच्या सदस्यांना त्याचा अभ्यास करून चर्चा करता यावी यासाठी आजची सभा तहकूब करण्यात आली.पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा …

Read More »