Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कोरोनासंदर्भात पनवेल मनपाची आढावा बैठक; लशीच्या पूर्वतयारीबद्दलही चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची पहिल्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनासंदर्भात महापालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच कोरोनाच्या लशीसंदर्भात काय पूर्वतयारी करायला हवी याबद्दल लोकप्रतिनिधींनी आपली मते …

Read More »

जागतिक दिव्यांग सप्ताह उत्साहात

पनवेल ः वार्ताहर भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो, पण या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया जाधव यांनी कार्यक्रमाचे सातत्य राखण्यासाठी तसेच मुलांचा व पालकांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

जेएनपीटीला ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल पोर्ट’चा पुरस्कार

उरण ः वार्ताहर भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जेएनपीटीला प्रतिष्ठित अशा सहाव्या अटल शास्त्र मार्केनोमी पुरस्कार 2020मध्ये ‘भारतातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल पोर्ट’ म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने जेएनपीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जेएनपीटीला सलग तिसर्‍यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. जेएनपीटीचे डेप्युटी कंजरवेटर कॅप्टन अमित …

Read More »

वेश्या व्यवसाय चालवणारी महिला जेरबंद

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई पनवेल ः वार्ताहर वेश्या व्यवसाय चालवणार्‍या महिलेस नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा फेज-2मधील सिल्व्हर लाइफ स्टाइल इमारतीतील घरावर छापा मारून अटक केली आहे. या वेळी पथकाने वेश्या व्यवसायासाठी बोलाविण्यात आलेल्या दोन मुलींचीही सुटका केली आहे. तळोजा से. 20 भागात शाल्या …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

पनवेल ः वार्ताहर लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना खारघर वसाहतीत घडली. खारघर परिसरातील एक महिलेने मागील 10 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा तक्रार अर्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे दिला आहे. महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी या प्रकरणाची सखोल …

Read More »

‘इनरव्हील’कडून निराधार वृद्धांना मदत

पनवेल : वार्ताहर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन संस्थेने नुकतीच शांतीवन येथील आधारघर, शांतीवन वृद्धाश्रम आणि कुष्ठरोग निवारण समिती यांना भेट देऊन तेथील निराधार वृद्धांसाठी फराळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर्स भेट दिले. येथील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावरील हास्य पाहून इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे तत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कोन ग्रामपंचायतीचे …

Read More »

रायगडात 68 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त र ा य ग ड  ि ज ल् ह्य ा त दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, बुधवारी (दि. 9) नव्या 68 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू ओढवला, तर दिवसभरात 127 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.पनवेल महापालिकेची स्थायी समिती सभा आद्य …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून होणार विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन 9 आणि 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी तसेच स्थानिक नेतेमंडळी …

Read More »