Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरणचे रानसई धरण वाहू लागले

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहे. पाऊस आणि डोंगरमाथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणार्‍या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहत असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रंजित बिरजे यांनी दिली. उरण तालुक्यातील 52 गावे, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागाला रानसई धरणातून …

Read More »

नवीन पनवेलच्या भुयारी मार्गात साचतेय पाणी

अपघाताला निमंत्रण; रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गाच्या कामात असलेल्या तांत्रिक चुकांमुळे त्यामध्ये पाणी साचत असून, या साचलेल्या  पाण्यातून वाहनचालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असताना रेल्वे …

Read More »

कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात बजरंग दलाकडून रक्तदान शिबिर

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा होत असून त्यात कोरोना रुग्णांचा जीव जात आहेत. या रुग्णांना जीवनदान मिळावे म्हणून विश्वहिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कळंबोली समित्यांच्या वतीने सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या सभागृहात एमजीएम रूग्णालय कामोठ्याच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आले होते. बजरंग दल कळंबोली समितीच्या …

Read More »

तळोजा परिसरात इमारतीला आग

बालकासह परिवाराचे जवानांनी वाचवले प्राण पनवेल : वार्ताहर तळोजा येथील एका इमारतीत रविवारी (दि. 19) लागलेल्या आगीत नऊ महिन्यांच्या बालकासह त्याचा परिवार जवळपास एक तास आत अडकला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तळोजा फेज-1 से.-11 येथे एके प्लाझा या …

Read More »

पनवेल तालुक्यात 181 नवे कोरोनाग्रस्त

पाच जणांचा मृत्यू; 117 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी  (दि. 19) कोरोनाचे 181 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 98 …

Read More »

खारघर ‘रोटरी मिडटाऊन‘चे विविध उपक्रम

पनवेल : वार्ताहर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे झाले आहे. मास्क वापरणे, सॅनिटायझरने वेळोवेळी हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे. रोटरी खारघर मिडटाऊनच्या वतीने या महामारीच्या काळात अनेक चांगले उपक्रम राबविले गेले. गरजुंना अन्नधान्याचे मोफत वाटप केले. यात रोजच्या वस्तूंचा समावेश होता. …

Read More »

‘सेंट जोसेफ’चा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक 12वी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने सायन्स व वाणिज्य शाखेत 100 टक्के यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवून विदुला घोडेकर हिने 95.84 टक्के गुण प्राप्त केले तसेच वाणिज्य शाखेत …

Read More »

भाजपकडून चिपळे गावात श्रमदान

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिपळे गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. यामध्ये गावातील गणेश घाटाची साफसफाई व दुरुस्ती तसेच गावदेवी मंदिर चिलाई येथील रस्त्याचे काम श्रमदान म्हणून केले. या वेळी श्रमदान करण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय पाटील, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पनवेल तालुका सरचिटणीस …

Read More »

इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांसाठी सुरक्षा रक्षक नेमावा

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त इंडिया बुल्स येथील अलगीकरण व विलगीकरण सेंटरमध्ये महिलांसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी भाजप नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल …

Read More »

भाज्यांचा जाणवतोय तुटवडा

पनवेल : बातमीदार पावसाळा सुरू झाला आहे आणि मंगळवारपासून श्रावण महिनाही सुरू होत आहे. अनेकांचा शाकाहार सुरू होऊन भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होणार आहे. मात्र अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारात भाज्यांची आवक कमीच आहे. त्यामुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून दरही वाढलेले आहेत. या आठवड्यापासून तर घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे दर …

Read More »