पनवेल : रामप्रहर वृत्त कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ’गुरुवंदना’ हा ऑनलाइन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाअंतर्गत पनवेल महापालिकेतील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यकामगार, शिक्षक व नवी मुंबई झोन 2 उपयुक्तालयाचे पोलीस यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला दिलेल्या धैर्य, संयम आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती या शिकवणीबाबत या कर्मगुरूंना मानपत्र देवून गौरविण्यात …
Read More »स्व. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी
पनवेल : जेबीएसपी संस्थेच्या एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांची सोमवारी (दि. 13) पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता नुटन आदींनी स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांच्या प्रतिमेस अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.
Read More »‘कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखा’
पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड 19 रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेवक चिपळेकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 विषाणूंमुळे संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या तीव्र …
Read More »भाजप नेते विलास राठोड यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास राठोड यांचे सोमवारी (दि. 13) निधन झाले. कै. विलास राठोड हे गोर बंजारा समाजाचे सर्वात ज्येष्ठ समाजसेवक, खारघर गोर बंजारा मंडळाचे संस्थापक, पनवेल तालुका भाजप अध्यक्ष (वि.भ.ज.सेल) होते. त्यांनी बंजारा समाजाला नवी मुंबईमध्ये सांस्कृतिक स्थान मिळवून दिले. भारतीय जनता पक्षाच्या …
Read More »शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; प्रशासनाचे आवाहन
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील शेतकर्यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना पिकासाठी वरदान असून, शेतकर्यांनी किमान हप्ता भरून पिकांचा व फळांचा विमा काढल्यास शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षित विमा रक्कम मिळते. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकर्यांनी राष्ट्रीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र येथे विम्याच्या हप्त्याची …
Read More »टिकटॉक फेम तरुणीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पोलिसांत गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर टिकटॉकवर प्रसिद्ध असलेल्या एका तरुणीचा प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवताना बनवलेला आणि तिच्याकडून चुकून स्नॅपचॅटवर पोस्ट झालेला व्हिडीओ काही लोकांनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून …
Read More »भेंड झाड नामशेष होण्याच्या मार्गावर
मोहोपाडा : प्रतिनिधी – कौले जाऊन घरावर सिमेंटपत्रे व सुरूचे वासे लावायला सुरुवात झाल्यावर भेंड (भेंडी) हे अनेक वापरात येणारे झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भेंड हे हिरवे गार सरळसोट व अनेक फांद्यांनी बहरून तयार असलेले झाड दिसायचे. गावचा शेतकरी आपल्या बैलगाडी साठी धुरंडी म्हणून …
Read More »गुरे चोरणार्या टोळ्यांचा उरणमध्ये सुळसुळाट; बंदोबस्त करण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात पाळीव गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून, रात्री-अपरात्री गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बेहोष करून गुरे चोरून नेली जात आहेत. पर्यायाने बळीराजाचे पशुधन संकटात येत असल्याने या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पशुधन कमी झाले आहे. मात्र …
Read More »गुरूद्वारा ट्रस्टतर्फे निर्जंतुकीकरण सेवा
पनवेल : वार्ताहर – कळंबोली गुरूद्वारा ट्रस्टतर्फे वसाहतीत शिख बांधव मोठ्या प्रमाणात जंतुनाशक व औषध फवारणी टँकरद्वारे करीत आहेत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कळंबोली गुरूद्वारा ट्रस्ट व शिख बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावावर अटकाव आणण्यासाठी व कळंबोली वसाहतीतून कोरोना समुळ नष्ट करण्याच्या उद्देशाने ते वसाहतीत ठिकठिकाणी ट्रस्टच्या …
Read More »लांडोरची शिकार करणारे अटकेत
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या डोंगरात लांडोर पक्षाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकार्यांनी पनवेल तालुक्यातील डोलघर येथील मुकेश पाटील (30), अजित गायकर(26), प्रेमनाथ गायकर (24), चंद्रकांत पाटील (36) या चार आरोपींना काल शुक्रवारी अटक केली आहे. उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या वरच्या भागातील डोंगरात गुरुवारी 9 जुलै रोजी रात्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper