उरण : प्रतिनिधी कोरोना संसर्गाचे समूळ उच्चाटन करायचे असल्याने नागरिकांनीही लॉकडाऊनला व संचारबंदीला मोकळेपणाने जाहीर पाठिंबा दिला, मात्र दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन मात्र वाढतच गेला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा, उद्योगधंदे, व्यवसाय नियमानुसार बंद करण्यात आले. यामुळे दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. वारंवार लागू होणार्या …
Read More »सर्वाधिक रुग्णसंख्या पनवेलमध्ये; प्रयोगशाळा मात्र अलिबागमध्ये
राज्य शासनाचा अजब कारभार पनवेल ः बातमीदार आरटी पीसीआर ही महत्त्वाची एक कोटी सात लाख रुपये खर्चाची प्रयोगशाळा अलिबाग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना राज्य शासनाच्या एकाही बड्या अधिकार्याला कोरोनाकाळातील स्थितीचा विचार करण्यास वेळ मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार हा पनवेल …
Read More »पनवेल तालुक्यात 216 नवीन रुग्ण
191 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 14) 216 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 191 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत रुग्णांत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. मंगळवारी येथे 175 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 134 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले …
Read More »मोरा सागरी पोलीस ठाण्याकडून नाकाबंदी
उरण ः वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यात 13 ते 16 जुलै या कालावधीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरण मोरा येथील हनुमान कोळीवाडा येथे मंगळवारी (दि. 14) कडक नाकाबंदी करण्यात आली. यात बाइकवर डबल सीट जाणे, हेल्मेटचा वापर न करणे, लायसन्स नसणे त्याचप्रमाणे …
Read More »आत्महत्येप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात राहणार्या राजेश मालपाणी यांनी मागील महिन्यात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आत्महत्येस जबाबदार असलेल्या कर्ज घेणार्या व देणार्या अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राजेश बाबूलाल मालपाणी (46) हे पनवेलमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. नवीन पनवेल …
Read More »ओबीसींच्या शिक्षणासाठी महाज्योती योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी
पनवेल ः प्रतिनिधी बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर आधारित भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी जाहीर झालेली महाज्योती योजना तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बबन बारगजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भटका-विमुक्त समाज हा वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. …
Read More »सिडकोच्या उद्यानाला डबक्याचे स्वरूप; कळंबोलीतील रहिवाशांमध्ये संताप
पनवेल ः वार्ताहर कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4मध्ये असणार्या सिडकोच्या उद्यानाला कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक व बच्चेकंपनीसाठी असणार्या उद्यानात चक्क वाहने उभी केली जात असून उद्यानाची दुरवस्था झाली आहे. याबाबत लेखी तक्रार दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानात केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात …
Read More »कोरोना रुग्णांसाठी किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून द्या!
आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांना निवेदन सादर पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल व उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. …
Read More »रायगडात सात कोरोना बळी; 342 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 13) झाली असून, 342 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये उरण तालुक्यातील तीन आणि खालापूर, कर्जत, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुका 205 (महापालिका 146, ग्रामीण 59), उरण 35, पेण 33, अलिबाग …
Read More »उरणमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
बाजारपेठ बंद, रस्ते निर्मनुष्य, पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त उरण : वार्ताहरकोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी उरण तालुक्यात तीन दिवस लॉकडाऊन लागू झाला असून, आवश्यकतेनुसार त्याचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 13) पहिल्याच दिवशी शुकशुकाट पहावयास मिळाला. साथरोग अधिनियमन 1897च्या कलम 2 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper