Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रायगडात सहा जणांचा मृत्यू; 247 नवीन रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 247 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 109 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 115,  पनवेल ग्रामीणमध्ये 67, रोहा 16, खालापूर 14, पेण 13, अलिबाग 12, कर्जत सहा आणि उरणमध्ये चार रुग्ण आढळले.  रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या …

Read More »

कोरोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन; पोलिसांकडून शोध सुरू

पनवेल : वार्ताहर कोरोना बाधित रूग्णांच्या संसर्गामुळे इतरांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती असताना देखील पनवेल भागात राहणार्‍या एका 32 वर्षीय कोरोना बाधित तरूणाने कामोठे येथील एमजीएम रूग्णालयातून कोणाला काही एक न सांगता पलायन केल्याची घटना घडली आहे. रूग्णालयातून पळून गेलेल्या या कोरोना बाधित रूग्णामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन त्यांच्या …

Read More »

रसायनी परिसरात कडकडीत बंद

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दहा दिवसांपासून वाढत चाचला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. परिसरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वासांबे मोहोपाडा, चांभार्ली व वावेघर ग्रामपंचायतीकडून चार दिवस परीसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत 41 कोरोनारुग्णांची संख्या झाली …

Read More »

कोळखे पेठ येथील पोलिसाची कोरोनावर मात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप चौधरी यांनी कोरोनावर मात केली आहे. जनतेच्या संरक्षानासाठी कर्तव्यदक्ष राहणार्‍या पोलिसांना या कोरोना महामारीच्या काळात कर्तव्यबजावत असताना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे रिद्धी सिद्धी, कोळखे पेठ येथे राहणार्‍या व पनवेल ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप चौधरी …

Read More »

‘मेरे देश की धरती’ लवकरच थिएटरमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आधारित ‘मेरे देश की धरती’ हा आगामी हिंदी चित्रपट 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये सर्व आवश्यक काळजी घेऊन रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दिव्येंदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोयनका असणार आहेत.  या चित्रपटाची निर्मिती कार्निव्हल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली गेली आहे. कार्निवल …

Read More »

उरण एसटी बस स्थानकात स्तनपान केंद्राची निर्मिती

उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण एसटी बस स्थानकात मंगळवारी (दि.30) हिरकणी कक्ष केंद्राची निर्मिती केली आहे. एसटी बस स्थानकात मातांना आपल्या बाळांना स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष अर्थात स्तनपान केंद्राची निर्मिती केली आहे. या कक्षाचे उद्घाटन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी लायन्स …

Read More »

मासळी विकणार्‍या दोन बोटी जप्त; उरणच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडून पुन्हा एकदा कारवाई

उरण : प्रतिनिधी शासनाने यांत्रिकी बोटींना खोल समुद्रातील मासेमारीला बंदी घातलेली असतानाही सहा मासेमारी बोटींवर 21 जून रोजी करंजा टर्मिनल्सजवळ करण्यात आलेल्या कारवाईनंतरही या विभागातील बोटी मालकांनी पुन्हा खोल समुद्रात मासेमारी करून बंदीचे उल्लंघन करीत मासळी विक्री केली. त्या वेळी खोपटे खाडीतील रिलायन्स जेटीवर दोन ताब्यात घेण्यात आल्या. उरणचे सहाय्यक …

Read More »

कोरोना काळात इतर आजारांवरील रुग्णांना जीवदान देणारे डॉक्टर नव्हे तर देवदूत!

पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे इतर रुग्णांचे हाल होत आहेत, पण काही डॉक्टर असे असतात की ते रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्यरत असतात. अशांपैकीच एक आहेत कॅन्सरवरील टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमधील डॉ. शैलेश व्ही. श्रीखंडे. त्यांच्याबद्दल त्यांच्याकडूनच बरे झालेले सतीश भालचंद्र वैरागी यांनी सांगितलेले …

Read More »

सृजनशील कवी हा समाजाला जोडणारा दुवा : परेश ठाकूर

‘कोमसाप’ नवीन पनवेल शाखेचे कविसंमेलन उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तसृजनशील मनाचा कवी हा समाजाला जोडणारा एक दुवा आहे, असे भावोद्गार पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 30) येथे काढले. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाइन कविसंमेलनातील ‘मी पुस्तक बोलतोय’ या पाचव्या पर्वाचे उद्घाटन ठाकूर यांच्या …

Read More »

रायगडात 266 नवे रुग्ण; पनवेलमध्ये लॉकडाऊन जाहीर

पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाच्या तब्बल 266 रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 136, पनवेल ग्रामीणमधील 31, पेण तालुक्यातील 20, रोहा 19, उरण, खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी 15, कर्जत नऊ, श्रीवर्धन तीन, सुधागड दोन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात एकाचाही मृत्यू …

Read More »