Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाची प्रतीक्षा संपणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्तसन 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी सोडत मार्च महिन्यात झाली होती, मात्र कोरोनामुळे तब्बल तीन महिने ही प्रक्रिया रखडली. दरम्यान या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. शिक्षण संचालकांना पत्र देत याबाबत त्वरित …

Read More »

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेल मनपा प्रशासनाला सूचना पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

‘आशा सेविकांचे मानधन वाढवून वेळेत द्या’

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या आशा सेविकांना उल्हासनगर महापालिकेप्रमाणे मानधन वाढवून आणि वेळच्या वेळी देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून डॉक्टर आणि आरोग्यसेवकांच्या बरोबरीने आशा सेविका काम करीत आहेत. घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, आजारी …

Read More »

दि. बा. पाटील : एक लढवय्या नेता!

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचा आज सातवा स्मृतिदिन. 24 जून 2013 रोजी ते अनंतात विलीन झाले, पण अखेरच्या क्षणापर्यंत ते लढवय्ये म्हणूनच जगले. शरीरात त्राण नसतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाचे नेतृत्व स्ट्रेचरवर जाऊन त्यांनी खंबीरपणे केले. यामागे प्रकल्पग्रस्तांविषयी असणारी आस्था व त्यांच्याविषयी असलेला जिव्हाळा हेच प्रमुख कारण होते. …

Read More »

विद्यार्थिनीची आत्महत्या

पनवेल ः शहरातील राहत्या इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारून 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रेया म्हात्रे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या श्रेयाने बाहेर जाऊन येते, असे आईला सांगितले. त्यानंतर तिने सनराईज बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी …

Read More »

रस्त्यांवरील विक्रेत्यांची आरोग्य तपासणी गरजेची -तेजस कांडपिळे

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक भाजी आणि फळविक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसून आपल्या मालाची विक्री करीत आहेत. यापैकी अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत असतानाही ते दवाखान्यात जाऊन उपचार घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने अशा विक्रेत्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे …

Read More »

निसर्ग चक्रीवादळात पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे नुकसान

पनवेल ः बातमीदार साधारणतः दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शाळांचे कौले, पत्रे उडाले असून भिंतीदेखील पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.   निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील शैक्षणिक दालनांची वाताहत झाली. अनेक घरे, शाळा उद्ध्वस्त झाल्या. या वादळात शाळांच्या इमारतींची …

Read More »

रायगडात 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 22) सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली. जिल्ह्यात 102 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात पनवेल महापालिका हद्दीत 53, पनवेल ग्रामीण आणि कर्जत तालुक्यात प्रत्येकी 20, उरण तालुक्यात तीन, पेण व महाड तालुक्यात प्रत्येकी दोन, तर …

Read More »

‘सोशल स्पार्क’च्या मास्कचा गोरगरिबांना आधार

पनवेल : प्रतिनिधीआपण ज्या समाजात राहतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून सोशल स्पार्क या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना योद्धे तसेच गोरगरिब नागरिकांना मास्कचे वाटप केले जात आहे. आज या ग्रुपमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील महिलाही सहभागी होऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपले योगदान देत आहेत, असे ग्रुप लीडर सुषमा …

Read More »

मासेमारी करणार्‍या यांत्रिकी नौकांवर धडक कारवाई

उरण ः प्रतिनिधी शासनाने यांत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रातील मासेमारीला महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही या बंदी आदेशाचे उल्लंघन करून खोल समुद्रात मासेमारी करून आलेल्या सहा मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981चे कलम 4नुसार कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली उरणचे …

Read More »