उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील गरजू बांधवाना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याबरोबर, चादर, चटईचे वाटप आणि विविध झाडांचे वृक्षारोपण केलेे. एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान काम शिक्षकांनी हाती घेतल्याने सीमा शुल्क विभागाचे अधिकारी महेंद्र भोईर, रमेश रहाटेसह अनेक जेष्ठ नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या संकटात राज्यातील जनता आपले …
Read More »अपंगत्वावर मात करीत भाजी विक्री
ट्रॅव्हल्सवाल्याने शोधला उदरनिर्वाहासाठी पर्याय कळंबोली : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील ट्रॅव्हल्स व्यवसाय करणारी दुकाने बंद आहेत. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत ट्रॅव्हल्स दुकानदार सापडले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ट्रॅव्हल्सच्या बुकिंगवर कामाला असणार्या हितेश पंड्या याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला आहे. अपंगत्वावर मात करीत …
Read More »पनवेल मनपातील ग्रामपंचायत कर्मचार्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन द्यावे
नगरसेवक अनिल भगत यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात भगत यांनी निवेदनही दिले …
Read More »‘कोरोनाग्रस्तांसाठी पनवेलमधील मोठ्या हॉटेल्समध्ये बेड्स तयार करा’
पनवेल : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वाढत्या कोरोना रुग्णांकरीता पनवेलमधील मोठी हॉटेल्स ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विविध रुग्णालयीन उपकरणे लावण्यात यावे. तसेच तेथे बेड्सचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रामध्येही कोरोना रुग्णांची संख्या …
Read More »पनवेल तालुक्यात 118 नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात 118 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी (दि. 25) पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. पालिका हद्दीत 82 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 35 रूग्ण बरे झाल्याने …
Read More »‘कोमसाप’चे उपक्रम जगण्याला ऊर्जा देतात -गणेश कोळी
पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनेक उपक्रमातून साहित्यिक कवी घडले, हेच कोमसापचे उपक्रम जगण्याला ऊर्जा देतात असे मत कोमसापचे रायगड जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी यांनी कोमसापच्या ऑनलाइन कवी संमेलनाच्या उद्घाटनच्या वेळी केले. ऑनलाइन कविसंमेलनाचे हे दहावे पुष्प होते. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण …
Read More »कुत्र्यांना विष देऊन मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार तालुक्यातील आकूर्लि येथे कुत्र्यांना विष देऊन मारल्या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकुर्ली येथील दिनेश भोपी हे घराचे आजुबाजुच्या परिसरामध्ये फिरणार्या एक लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाच्या कुत्र्याला रोज खावु देत असत. 21 जून रोजी त्यांना घराच्या समोर एक लाल …
Read More »कळंबुसरे येथे नऊ फुटी अजगरास जीवदान
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील एका घराच्या पडवीत रात्री भक्ष्य पकडण्याच्या शोधात आलेल्या आजगराला काशिनाथ खारपाटील, रमेश फोफेरकर, जगन्नाथ पाटील या निसर्ग संरक्षण सर्प मित्र संस्थेच्या सर्पमित्रांनी सदर ठिकाणी धाव घेवून या 9 फुटी अजगराच्या अलगद पकडले. यानंतर या विभागातील वनपाल यांच्या समक्ष इंद्रायणी डोंगरातील जंगलात मुक्त संचार …
Read More »मोहोपाडा गणेशनगरमध्ये दोघांना कोरोना
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे (मोहोपाडा) हद्दीत मागील आठवड्यापासून पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून गुरुवारी गणेशनगरमध्ये दोघा पती-पत्नीचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. पती कामानिमित्त तळोजा येथे ये-जा करत होता. त्यातच कोरोना संसर्ग झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. सध्या वासांबे मोहोपाडा हद्दीत गणेशनगरमध्ये दोन, नविन पोसरी दोन,भटवाडी एक, रिस एक, रिसवाडी …
Read More »घाऊक बाजारात भाज्या महागल्या
पनवेल : बातमीदार वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेले महिने घाऊक बाजारात दर स्थिर होते. मागील आठवडयात भाज्यांचे दर स्थिर होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोज 500 ते 550 गाड्यांची आवक होत आहे. कोरोनामुळे बाजारात दाखल होणार्या गाड्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper