उरण : वार्ताहर, प्रतिनिधी लॉकडाऊन काळात विजेच्या वस्तू ना दुरुस्ती झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु उरणमध्ये रविवार (दि. 3) पासून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हार्डवेअर व विद्युत उपकरणे दुरुस्ती, बुक स्टेशनरी विक्रेते, प्लायवूड विक्रेते, स्पेअर पार्ट्स विक्रेते, मोबाइल रिफिलिंग, अगरबत्ती विक्रेते आदी दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. …
Read More »स्वामीनारायण ध्यान केंद्रातर्फे फूड पॅकेट्स
पनवेल : वार्ताहर कोरोना वायरसमुळे पनवेलमध्ये आणि राज्य तसेच देशभर लॉकडाऊन आहे. त्या लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. अशा लोकांनी खावे तरी काय अशी परिस्थिती होती. त्या अनुषंगाने देवाज्ञाने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने या गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी …
Read More »पमपा अधिकारी-कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटर मशिन
पनवेल : वार्ताहर आजच्या घडीला कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. भविष्याचा वेध घेणे कठीण बनले असून या सर्व परिस्थितीची जाण ठेवून अपंश्री ऑटोमेशन प्रा. लि. च्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटरचे पाच-पाच मशिन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आपले प्रशासन दिवसरात्र झटत आहे. …
Read More »ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबकडून पनवेल महानगरपालिकेसाठी मदत
निवारागृहासाठी तीन टन तांदूळ, मसाल्याचे पदार्थ पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबने निवारागृहासाठी तीन टन तांदूळ व मसाल्याची मदत केली आहे. ज्यबिलिएंट फार्मा लॅबने यापूर्वी पनवेल महानगरपालिकेस एक टन सोडीयम हायपोक्लोराईड देऊन सामाजिक दायीत्व दर्शविले होते. रविवारी (दि. 3) पुन्हा या खाजगी लॅबने पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिका संचलित …
Read More »विदेशी दारू विक्री करणारा अटकेत
नवी मुंबई पोलिसांची कारवाई उरण : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर – जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढत असतांना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत नवी मुंबई ऐरोली येथे विदेशी दारू विक्रीसाठी आलेल्या इसमास नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने रंगेहात पकडून मुद्देमुलासह अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून …
Read More »सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक खारघर विभाग जितेंद्र मढवी यांच्या सोबत शनिवारी (दि. 2) सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात एक आढावा बैठक घेतली. दिवसेंदिवस खारघरमधील …
Read More »खांदा कॉलनीतील कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावी -गणेश पाटील
कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खांदा कॉलनी वसाहतीतील नाले, गटारे सफाई, रस्त्यांची डागडुगी तसेच फुटपाथची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. ही सर्व कामे प्रकल्पग्रस्त करत आले आहेत पण यावर्षी कोरोना महामारीचा फायदा उठवत सिडको अधिकार्यांनी त्यांच्यावर अन्याय केला …
Read More »कम्युनिटी किचनसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खारघर भाजप यांच्या वतीने अन्नछत्र (कम्युनिटी किचन) सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी (दि. 2) अनेक जणांनी आर्थिक मदत केली. यामध्ये ईश्वर नारायण पटेल 10,000 रुपये, दुर्गादास महाजन …
Read More »गावागावांत जनता कर्फ्यूची हाक
पनवेल : बातमीदार – नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांच्या चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गावागावांत स्वयंघोषित जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे. घणसोली गावात सलग सहा दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले असून मंगळवारपासून गावात हा कर्फ्यू लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोपरखैरणेतील …
Read More »पिडिलाईट कंपनी, टिआयएतर्फे पोलिसांना पीपीई किट वाटप
पनवेल : वार्ताहर – नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या अधीन असलेल्या पोलीस कर्मचार्यांना वैयक्तिक संरक्षणात्मक किट वितरित करण्यासाठी भारत आधारित अॅडव्हाईज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पिडिलाईट इंडस्ट्रीज जी फेविकॉल आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पिडिलाइट उद्योगांच्या वतीने तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याकडे 180 वैयक्तिक संरक्षक किट हस्तांतरित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper