Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पोलिसांकडून आदिवासी बांधवांना मदत

पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. ताडपट्टी मालडुंगे परिसरातील काही आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना अद्यापपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती पत्रकार संजय कदम यांनी पनवेल तालुका पोलीस …

Read More »

पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी

पनवेल ः वार्ताहर रामटेक दिपकेर पेस्ट कंट्रोल (नेरूळ) नवी मुंबई विभागाच्या माध्यमातून खांदेश्वर पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिप पेस्ट कंट्रोलकडून खांदेश्वर पोलीस ठाणे इमारतीत व पोलिसांच्या वापरात येणार्‍या वाहनांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. दीप पेस्ट कंट्रोल यांनी केलेल्या कामाबद्दल खांदेश्वर पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी त्यांचे आभार व्यक्त …

Read More »

छात्रभारतीकडून मजुरांना मदतीचा हात

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये यासाठी छात्रभारती पुढे येऊन काम करीत आहे. मोहोपाडा (नवीन पोसरी) येथे आतापर्यंत छात्रभारतीच्या वतीने 30 कष्टकरी मजुरांना व कुटुंबीयांना 218 किलो तांदूळ, 218 किलो आटा, 90 लिटर तेल, 70 किलो डाळ, 60 …

Read More »

उरणकरांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणात जून अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे, मात्र पाऊस लांबणीवर पडल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून 3 मेच्या लॉकडाऊननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उपअभियंता रंजित …

Read More »

शिधावाटप दुकाने बंद ठेवणार्यांवर कारवाई

शिधावाटप उपनियंत्रकांचे आदेश; परवाने होणार रद्द पनवेल ः बातमीदार नवी मुंबईमधील ऐरोली, दिघा ते बेलापूरपर्यंत पसरलेल्या शिधावाटप दुकानदारांनी 1 मेपासून मोफत अन्नधान्य वाटप करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. नियमित धान्यवाटप झाले की शिधावाटप दुकाने बंद केली जातील, असेही स्पष्ट केले आहे. या आशयाचे पत्र मुख्य शिधावाटप अधिकार्‍यांना दिले आहे. दुकानदारांच्या …

Read More »

सपोआ. विनोद चव्हाण यांचा तपासास नकार

कर्नाळा बँकेतील करोडोंच्या गैरव्यवहारांचा तपास आता वपोनि. विजय वाघमारेंकडे पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेत झालेल्या करोडोंच्या गैरव्यवहाराची चौकशी आता सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद बाबू चव्हाण यांच्याऐवजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. वाघमारे हे नवी मुंबईच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …

Read More »

नवीन पनवेलमधील पोलिसाला कोरोनाची लागण

पनवेल : नवीन पनवेलमधील एका पोलीस कर्मचार्‍याचा  कोरोना रिपोर्ट सोमवारी (दि. 27) पॉझिटीव्ह आला. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍या कर्मचार्‍यांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्याबाबत उचित निर्णय घेऊन पनवेलकरांना संसर्गापासून वाचवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या नव्या रुग्णामुळे पनवेल महापालिका …

Read More »

उरणमधील बाळाची कोरोनावर मात

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील जासई येथील 18 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. हे बाळ आजारी असल्याने त्याला 12 एप्रिल रोजी जासई येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. …

Read More »

मुंबईला जाणार्यांचे प्रवास थांबवावेत

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक मुंबई येथे कामास्तव जाणार्‍या लोकांचे प्रवास थांबविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात …

Read More »

आसूडगावात जनता कर्फ्यूला प्रतिसाद

कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या परिसराला लागून असलेल्या आसूडगाव परिसरात कोरोनोचा शिरकाव होवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आसुडगाव परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्वयंस्फुर्तीने दि. 24, 25, 26 एप्रिलला जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्याला सर्व जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी …

Read More »