पनवेल : वार्ताहर गुढीपाडवा हा वर्षात असलेल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो तसेच आजचा दिवस हा मराठी नववर्ष दिवस म्हणूनसुद्धा मानला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे पनवेलकरांनी या दोन्ही सणांचे स्वागत घरात बसूनच केले. गुढीपाडवा व मराठी नववर्ष म्हणजे आनंदाचा उत्सवच असतो. या निमित्ताने घराघरातून गुढ्या उभारणे, शोभायात्रा, मिरवणुका यात …
Read More »परप्रांतीय भाजी विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
संचारबंदी असतानाही दुकानासमोर पडदा लावून भाजी विकण्याचा प्रकार उरण : प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्य व्हायरसचे जंतू पसरू नये यासाठी राज्य सरकारने अखेर संचारबंदी लागू केली असून, प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असताना, उरण तालुक्यातील चिरनेर, कोप्रोली नाक्यांवर परप्रांतीय भाजी विक्रेत्यांकडून दुप्पट रकमेच्या भावाने ग्राहकांची लूट करीत आहेत. नवी मुंबई …
Read More »जमावबंदीत बेकायदा दारूविक्री जोरात
पनवेल : बातमीदार दोन दिवसांपासून दारूविक्री करणारी दुकाने बंद झाल्यामुळे तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. संचारबंदी, जमावबंदी असताना खारघरमधील गावांमध्ये सुरू असलेल्या दारूविक्रीला जोर आला आहे. इतर ठिकाणी दारू मिळत नसल्यामुळे गावांमध्ये चढ्या दराने दारूविक्री केली जात आहे. सिडकोने विकसित केलेल्या खारघर झोनमध्ये पूर्वीपासून दारूबंदी असल्यामुळे खारघर शहरात दारूविक्री करणारे …
Read More »कर्जत तालुक्यात गावांची अघोषित संचारबंदी
अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे, मात्र तरीदेखील किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकल या अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी अत्यावश्यक वस्तू मिळत असल्याने लोक समाधानी असून खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, मिठाईची दुकाने मात्र …
Read More »भाजपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त : भारतीय जनता पक्ष पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र.19च्या वतीने पनवेलकरांसाठी गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा (जछङखछए टणखन उेाशिींळींळेप) आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ुुु.रिीशीहींहरर्ज्ञीी.ळप या वेबसाइट भेट द्या. स्पर्धा ही गुढीपाडवाच्या दिवशी बुधवारी (दि. 25) सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असेल. सर्व विजेत्या स्पर्धकांना …
Read More »संचारबंदी डावलणार्यांवर गुन्हे दाखल; उरणमध्ये पोलिसांची धडक कारवाई
उरण : वार्ताहर : महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री पासून संचारबंदी लागू केल्याने नागरिकांनी उरण बाजार पेठेत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गर्दी करू नका, कामाशिवाय घराच्या बाहेर फिरू नका, किराणा दुकानांत समान खरेदी करताना अंतर ठेवा, अशाप्रकारची जनजागृती पोलीस गाड्यांतून करीत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे …
Read More »जमावबंदीत रस्त्यावर फिरणार्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद
पनवेल : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पनवेल परिसरात जमावबंदी लागू केली असतानाही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहने रस्त्यावर काढत आहेत. अशांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल …
Read More »कोरोना : नेरेपाडा, शिरढोणमध्ये नो एण्ट्री
बाहेरील नागरिकांना गावात प्रवेशबंदी; तरुणांसह ग्रामस्थ सरसावले पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्चपर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. …
Read More »न्हावा शेवा वाहतूक शाखेतर्फे जेएनपीटी चेअरमन यांना निवेदन
उरण : वार्ताहर कोरोना (कोविड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांना न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशात व महाराष्ट्र, मुंबईसह कोरोना हा संसर्गजन्य प्रसारीत झाल्याने व त्याची लागण …
Read More »कर्जत, नेरळमध्ये पोलीस आक्रमक
कर्जत : बातमीदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू पहाटे संपल्यानंतर रात्री 12पासून महाराष्ट्र सरकारने जमावबंदीचा कलम 144 लागू केला आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असताना देखील कर्जत तालुक्यातील सर्व बाजारपेठा गिर्हाईकांनी फुलल्या होत्या. शेवटी कर्जत आणि नेरळची बाजारपेठ पोलीस दल आक्रमक झाल्याने बंद पाडण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper