बाजाराला ‘बंद’चे स्वरूप पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणूची 14 जणांना लागण झाल्याने भाजीची वाहतूक करणारी निम्मीच वाहने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजी बाजारात शुक्रवारी (दि. 1) दाखल झाली. गुरुवारी बाजारात भाजीची 169 वाहने आली होती, तर शुक्रवारी भाज्यांची 95 वाहने बाजारात आणली गेली. याच वेळी शनिवारपासून भाजी …
Read More »विसपुते कॉलेजमध्ये ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र आणि कामगार दिन
पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन नवीन पनवेल मधील आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) 87 डीएसएमच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाइन साजरा करण्यात येऊन आदर्श शैक्षणिक समूहाच्या बी.एड्. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी …
Read More »केगाव हद्दीत मृत डॉल्फिन
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्यावर शुक्रवारी (दि. 1) मृत डॉल्फीन मासा वाहून आला आहे. या मृत डॉल्फिन माशाची लांबी साधारणता आठ फूट असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्यावर मृत अवस्थेत आढळून आलेल्या डॉल्फिन माशाची माहिती येथील केगाव ग्रामपंचायतीने वनविभागाला …
Read More »सावळे येथे दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील सावळे येथील दोन गटातील जमावाने वैयक्तिक कारणातून एकत्र जमून शाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत होऊन एका परिवाराला दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण करीत रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. या जमावाने रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचाही भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात परस्पर …
Read More »‘त्या’ मागणीची तातडीने कार्यवाही करा -दर्शना भोईर
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणार्या अधिकारी-कर्मचार्यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी पाहता आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »वीजग्राहकांसाठी चेक ड्रॉप बॉक्स
पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील वीजग्राहकांसाठी वीज वितरण कंपनीचे पनवेल शहर कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी विशेष उपाय योजना केली आहे. वीजग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. यासाठी नवीन यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी …
Read More »जिल्हाधिकार्यांकडून उरणची पाहणी
उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्याचा बुधवारी (दि. 29) धावता दौरा केला. कोरोनाबाबत या वेळी उरण येथील परिस्थिती जाणून घेतली. संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांनी या संदर्भात काही सूचना आणि मोलाचे मार्गदर्शन केले. कोरोनापासून दक्षता घ्या, खबरदारी घ्या, नागरिकांचे …
Read More »उरणमधील तीन रुग्ण कोरोनामुक्त, तर चौथाही मुक्तीच्या मार्गावर
उरण : प्रतिनिधी जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसने मागील दीड महिन्यांमध्ये सर्वांना सळो की पळो करून सोडले असून, या संसर्गाने सर्वच ठिकाणची शासकीय यंत्रणा रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून सतर्क झाली आहे. उरण तालुक्यात 12 एप्रिल 2020 रोजी पाहिले दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. यामध्ये उरण कोटनाका येथील परिसरात …
Read More »कामोठे, करंजाडेत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामोठे आणि करंजाडे वसाहतीमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. कामोठ्यात 30 एप्रिल ते 3 मे असे चार दिवस, तर करंजाडेमध्ये 1 व 2 मे तसेच जोपर्यंत लॉकडाऊन सुरू राहिल तोपर्यंत प्रत्येक आठवड्यातील शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने दररोज हजारो गरजू लोकांना जेवण
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने दररोज हजारो लोकांना जेवण पुरविले जात असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यामुळे जाही लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मोलमजुरी करणारे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper