Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमधील विकासकामांसंदर्भात मुंबईत बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील नवीन पूल बांधणे, विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवर नवीन पूल बांधणे, तसेच पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे अतिरिक्त …

Read More »

पनवेलमध्ये विकसकाने बांधली चाळीवर दुमजली इमारत

पनवेल : प्रतिनिधी पटेल मोहल्ला पनवेल येथील बोहरा चाळीत भाडेकरू राहत असताना विकसक त्यावर स्लॅब टाकून दोन मजली इमारत  उभी करीत असल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भाडेकरूंनी पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची माहिती देऊन नगरसेवक मुकीत काझी यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे. पनवेलमधील पटेल मोहल्ला येथील …

Read More »

संघशाखेत राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माणाचे कार्य -डॉ. समिधा गांधी

पनवेल : रामप्रहर वृत्त संघाच्या शाखेत चालणारे व्यायाम, खेळ, कवायती व बौद्धिकांमधून राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माणाचे कार्य होत असल्याचे गौरवोद्गार डॉ. समिधा गांधी यांनी काढले. पनवेल शहरातील नंदनवन प्रभात शाखेचा पहिला वार्षिक उत्सव रविवारी (दि. 8) झाला. वार्षिक उत्सवाच्या दिवशी जागतिक महिला दिन होता.  त्या दिनाचे औचित्य साधून सदर उत्सवाकरिता पनवेलमधील …

Read More »

कर्नाळा बँकेवर प्रशासक

आठवड्यातच ठोस कारवाई करणार -पोलीस आयुक्त पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचारानंतर शासनाने बँकेवर प्रशासक अधिकार्‍याची नेमणूक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 9) माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेऊन घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत आला याबाबत …

Read More »

विकासकामांबाबत कळंबोली भाजप आक्रमक

सिडकोविरोधात ठिय्या आंदोलनाचा पवित्रा पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोलीमधील रस्ते, गटारे आदी विविध नागरी कामे पूर्ण न केल्यास सिडको कार्यालयामोर ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा कळंबोली भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदनही देण्यात आले आहे. अंतर्गत रस्ते व गटारे नवीन करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. तरीसुद्धा त्या रस्त्याचे पॅचवर्क कामाचे …

Read More »

पुरणपोळ्यांचे वाटप : कामोठे भाजप युवा मोर्चा मंडळाचा उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळाने एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची नावाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. कामोठे शहरातील अनेक सामाजिक संस्था तसेच सोसायटी, मंडळ यांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला कामोठेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. आणि 500 पुरणपोळ्या  पनवेल येथील अनाथ आश्रम तसेच वृध्दाश्रम येथे …

Read More »

कामोठे येथे महिलांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा कामोठे तालुका मंडळ यांच्या वतीने महिला आरोग्यविषयक विशेष व्याख्यान आणि विविध खेळांचे आयोजन रविवारी (दि. 8) करण्यात आले होते. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात डॉ. महेकाशान पटेल यांचे …

Read More »

पहिली महिला बुद्धिबळ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष तसेच जागतिक महिलादिनानिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालयात पनवेल चेस असोसियशन आयोजित रायगडमधील पहिली खुली महिला बुद्धिबळ स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी ठाणे, नवी मुंबई, कर्जत, खोपोली, पाली, अलिबाग येथील 42 महिला व 25 मुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन ब्रम्हकुमारी डॉ. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर-तळोजा मंडल भाजप महिला मोर्चा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त खारघर शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्हे, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. 1)चारूलता अभय डोणगावकर-(दिव्यांग सेवा)उच्च शिक्षित, स्वमग्नता या विषयात प्राविण्य असलेल्या व सतीश हावरे दिव्यांग …

Read More »

अबोली रिक्षा महिला चालक संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

पनवेल : वार्ताहर अबोली रिक्षा चालक महिला संघटनेच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आठ महिलांचा गौरव केला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, अभिनेते अरुण कदम उपस्थित होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, दै. …

Read More »