नवी मुंबई : बातमीदार : सभागृह नेते तथा भाजपचे नगरसेवक रवींद्र इथापे व माजी नगरसेविका सुरेखा इथापे यांच्या वतीने शनिवारी (दि. 29) कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्याचे व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन नेरुळ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे व कार्यअहवालाचे …
Read More »आवरे येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिन
उरण : प्रतिनिधी : आत्माराम ठाकूर मिशनचे जे. जे. ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे येथे जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत …
Read More »गुळसुंदे हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा
रसायनी : रामप्रहर वृत्त : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील तुंगारतन विभाग विद्यामंदिरात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान दिनानिमित्त वांद्रे (मुंबई) येथील अध्ययन संस्थेमार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्ययन …
Read More »वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव
पनवेल : रामप्रहर वृत्त : वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी संपदा पालव यांचे सोमवारी (दि. 2) अभिनंदन केले. संपदा पालव यांची वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल …
Read More »‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण केला जातोय -डॉ. विनय सहस्रबुद्धे
पनवेल : रामप्रहर वृत्तमागील तीन-साडेतीन महिन्यांचा घटनाक्रम पाहता अपप्रचाराची विषारी हवा एखाद्या केमिकल वॉरसारखी समाजात अस्वस्थता निर्माण करायला कारणीभूत ठरत आहे. हा एक प्रकारचा आतंकवाद आहे. चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) संसदेत …
Read More »मोठा खांदा येथील रक्तदान शिबिर उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष मोठा खांदा आणि पवन पुत्र महिला मंडळ यांच्या वतीने सलग तीन वेळा आमदार म्हणुन तसेच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 1) मोठा खांदा येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे …
Read More »मोरा येथील रक्तदान व आरोग्य शिबिराला भरगोस प्रतिसाद
उरण : वार्ताहर मुंबईच्या भायखळा येथील मासिना हॉस्पिटल व उरण-मोरा भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 1) मार्च न्यू इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आले. त्यात 185 रुग्णांची तपासणी करून मोफत औषध देण्यात आली. मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरास …
Read More »त्या सत्तरीच्या ‘तरुणीं’ची धमाल : वृध्दाश्रमात आनंदोत्सव
पनवेल : प्रतिनिधी सैंया दिल में आना रे, आके फिर न जाना रे म्हणत सुंदर नृत्य करणार्या त्या सत्तरीच्या तरूणी पाहून समोर बसलेल्या त्यांच्याच वयाच्या तरूण आजोबांच्या हृदयात धडधडू लागले नाही तर नवलच. त्यांच्या चेहर्यावर तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ …
Read More »‘प्रायमा’तर्फे रसायनीत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी डॉक्टर असोसिएशन (प्रायमा)यांच्या वतीने रसायनी गुळसूंदे तुंगारतन विद्यालयातील 250 हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रायमाच्या सर्व डॉक्टरांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवा देण्यात सहभाग नोंदवला. प्रायमाच्या अध्यक्षा डॉ. लेखा उचील ह्यांनी ह्या आणि अशा स्वरूपाचे …
Read More »पनवेल शहर पोेलिसांतर्फे के. वी. कन्या शाळेत कार्यशाळा
पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलिसांनी महिला वर्गामध्ये तसेच अल्पवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थ्यांनीची कार्यशाळा घेतली होती. महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे व महिला पोलीस नाईक विद्या भगत यांनी या शाळेत जावून विद्यार्थींनीची कार्यशाळा घेतली. या वेळी सुमारे 150 आसपास विद्यार्थीनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper