पनवेल : रामप्रहर वृत्त गोरगरीब-कष्टकर्यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्वर्गीय जनार्दन भगत यांची प्रतिमा त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने बसविण्यात आली. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या प्रतिमेचे अनावरण शनिवारी (दि. 29) करण्यात आले. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त विविध …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात निबंध स्पर्धा उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय जनार्दन भगतसाहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धा मंगळवारी (दि. 25) आयोजित केली गेली. संस्थेच्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते न्यू लूक सल्लोन अॅण्ड स्पा शॉपचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर खारघरमध्ये लक्ष्मी खिर्डीकर व त्यांचे पती दिनेश खिर्डीकर यांनी शहरात सेक्टर 12 या ठिकाणी न्यू लूक युनिसेक्स सल्लोन अॅण्ड अॅकॅडमीची सुरुवात केली आहे. या शॉपचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दुकानाचा उद्घाटन सोहळा लक्ष्मी खिर्डीकर, त्यांचे पती दिनेश खिर्डीकर व अशरफ शेख यांच्या वतीने …
Read More »बांगलादेशींची धरपकड
कळंबोलीतून नऊ महिलांना अटक पनवेल : बातमीदार घुसखोरी करून भारतात राहत असलेल्या बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. कळंबोली पोलिसांनी नुकतेच स्टील मार्केट व इतर परिसरातून अश्लील हावभाव व हातवारे करणार्या 11 महिलांना ताब्यात घेतले आहे. यातील नऊ महिला बांगलादेशी आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिसरात बांगलादेशी …
Read More »रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या 92व्या जयंतीचे औचित्य साधून स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व एमजीएम हॉस्पिटल रक्तपेढी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात …
Read More »अवैध अग्निशस्त्र बाळगणारा उरणच्या नवघरमध्ये जेरबंद
उरण : प्रतिनिधीबेकायदेशीरपणे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उरण तालुक्यातील नवघर येथून सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.राजेशकुमार रामफेर बिंद (वय, 45, रा. वडाळा, मुंबई, मूळ रहिवासी आनापूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) असे या आरोपीचे नाव …
Read More »आज स्व. जनार्दन भगत जयंती व जीवन गौरव पुरस्कार सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब-कष्टकर्यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय येथे होणार आहे. स्व. जनार्दन भगत यांच्या …
Read More »कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरण ; ठेवीदारांच्या ठेवी तत्काळ परत करा
सहकार आयुक्तांचे बँकेला आदेश आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या तारांकित प्रश्नाला सहकार मंत्र्यांचे उत्तर पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेत बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व व्यवस्थापनाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून या बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तत्काळ परत करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी कर्नाळा बँकेला दिले आहेत, अशी …
Read More »‘सीकेटी’त सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी, जागतिक मराठी गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि स्व. जनार्दन भगत यांची 92वी जयंती हे चारही दिवस एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या वेळी विद्यावर्धिनी अॅकॅडमीच्या संचालिका वरदा जोशी या …
Read More »भाजप नेते पी. जे. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जसखार गावातील भाजप जेष्ठ नेते शिक्षण प्रेमी पी. जे. पाटील यांचा 76वा वाढदिवस मोठ्या उत्साहात बुधवारी (दि. 26) जसखार येथे साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, कामगार नेते तथा भाजप रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, भाजप रायगड जिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper