Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पनवेल : बातमीदार कळंबोलीतील सेंट्रल फॅसिलिटीज इमारतीत असलेल्या सिंडिकेट बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी पहाटे घुसलेल्या एका लुटारूने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.  चोराने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र …

Read More »

विविध मागण्यांसाठी आयुक्तांना साद, सभापती कुसूम म्हात्रे यांच्याकडून निवेदने सादर; स्मार्ट सिटीसाठी प्रयत्नशील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसूम रवींद्र म्हात्रे यांनी कामोठे गाव स्मार्ट सिटी बनविण्याबाबत कामोठे सेक्टर 20मधील गार्डनला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत व दिव्यांगांना अर्थसहाय्य मदत मिळण्याबाबत अशा विविध मागण्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदने दिली आहेत. कुसूम म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे …

Read More »

सीकेटी विद्यालयात ‘कॅलिडोस्कोप’

वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्लिश मीडियम माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. 7) झाले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ बेहराम मोहता आणि संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

‘सीकेटी’च्या इंग्रजी माध्यमाचे स्नेहसंमेलन उत्साहात

‘रिफ्लेक्शन’ वार्षिक नियतकालिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पनवेल : रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन मंगळवारी (दि. 7) अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाले. कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. यानंतर शाळेच्या गायकवृंदाने सादर केलेल्या सुरेल ईशस्तवन आणि स्वागतगीताने वातावरण सुमंगल झाले. पर्यवेक्षिका निरजा मॅडम …

Read More »

राज्य सरकारविरोधात कर्मचार्यांचा एल्गार!

तहसीलवर एकदिवसीय लाक्षणिक संप पनवेल : बातमीदार पनवेल येथील सरकारी कर्मचार्‍यांतर्फे राज्य सरकारविरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या वेळी अनेक राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्‍यांना लागू करावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित …

Read More »

पनवेलमध्ये भरणार रायगड सरस प्रदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या रायगड सरस या प्रदर्शनाचे आयोजन पनवेल मध्ये गुरुवार (दि. 9) ते सोमवार (दि. 13) या दरम्यान पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराथी शाळेच्या मैदानामध्ये केले आहे. या प्रदर्शनामध्ये स्वयं सहाय्यता समुहातील हस्तकला वस्तु व खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनातील खास आकर्षण …

Read More »

पनवेल पालिका हद्दीतील बेवारस वाहनांवर कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील पदपथ व रस्ते यावर अनधिकृतपणे दुरूस्त होत असलेली वाहने, पडीक, बेवारस वाहनांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 230 व अनुषंगीक कलमान्वये कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी झालेल्या ठरावानुसार एकुण 693 बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. …

Read More »

अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते अलविदा डायबिटीज डायटचे माहितीपत्रक सादर

पनवेल : नील हॉस्पिटल येथे बार असोसिएशनचे अध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते अलविदा डायबिटीज डायटचे माहितीपत्रक सादर करण्यात आले. या वेळी बीके डॉ. शुभदा नील, रिपोर्टर अनिता चौहान, योगा टीचर गुप्ता मॅडम, प्रभा सिन्हा, मा. शिक्षण अधिकारी सुरेश जाधव, किशोर मोरे, वंदना नील, बीके रेहना उपस्थित होते.

Read More »

वाहनचालकांवर कळंबोली पोलिसांची कारवाई

पनवेल : बातमीदार   कळंबोली पोलिसांनी ई-चलन मशिनद्वारे 2019 या वर्षामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 6,792 वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 22 लाख 82 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत विनाहेल्मेट, ट्रीपल सीट नेणार्‍या वाहनचालकांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेशिस्त वाहनचालकांमुळे रस्ते …

Read More »

खवल्या मांजराची विक्री करणार्यास अटक

पनवेल : बातमीदार, वार्ताहर दुर्मीळ अशा वन्यप्राणी खवल्या जातीच्या मांजराची तस्करी व विक्री करणार्‍या व्यक्तीस खांदेश्वर पोलिसांनी गाडीसह अटक केली आहे. वन्यप्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम आसूडगाव बसस्टॉपजवळ येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांना मिळताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुळबा ढाकणे, पोलीस …

Read More »