Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘पोस्को’ प्रकरणातील मुलगी बेपत्ता

पनवेल : बातमीदार पुणे येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर दाखल झालेल्या ’पोस्को’ गुन्हा प्रकरणास गंभीर वळण लागले आहे. मोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार करणारी अल्पवयीन बालिका घरातून बेपत्ता झाली असून, ’माझा शोध घेऊ नका, माझ्या मृत्यूला निशिकांत मोरे जबाबदार असतील,’ असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी तिच्या घरी …

Read More »

जासई विद्यालयात विविध स्पर्धा

जासई : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत शाळांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. 7) झाला. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष …

Read More »

खांदा कॉलनीतील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ

नगरसेवक संजय भोपी यांचे प्रयत्न खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्ती कामासाठी नगरसेवक संजय भोपी यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. 15मधील खांदा कॉलनी सेक्टर 8 मधील नवरत्न सोसायटीच्या फुटपाथवर सोसायटीतील …

Read More »

जेएनपीटीची प्रभावी कामगिरी

भारतात प्रथमच 5.10 दशलक्ष टीइयू हाताळण्याची कामगिरी जेएनपीटी : वृत्तसेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या भारतातील प्रमुख कंटेनर पोर्टने त्यांची कार्गो हँडलिंगमधील प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. पोर्टने सन 2019 या वर्षात 5.10 दशलक्ष वीस फूट इक्विवॅलंट युनिट म्हणजेच टीइयू यशस्वीपणे हाताळले आहेत. 2018मध्ये पोर्टने 5.5 दशलक्ष टीइयू हाताळले …

Read More »

पनवेलच्या महापौर, उपमहापौरपदांकरिता भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

डॉ. कविता चौतमोल, जगदिश गायकवाड यांच्या विजयाची केवळ औपचारिकता पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाकरिता डॉ. कविता चौतमोल यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे, तर उपमहापौरपदासाठी आरपीआयचे जगदिश गायकवाड यांना संधी देण्यात आली. दोघांनी आपले अर्ज मंगळवारी (दि. 7) पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविकांच्या उपस्थितीत दाखल केले.पनवेल महापालिकेची स्थापना …

Read More »

‘कमळ पतसंस्थेकडून सभासदांच्या ठेवींना संरक्षण’

पनवेल : वार्ताहर येथील कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या गुंतवणूक निधी संस्थेच्या असेटस् आणि अन्य निधी पाहता संस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींना 100 टक्के संरक्षण देणारी रायगड जिल्ह्यातील एकमेव कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे, असे उद्गार संस्थेचे संस्थापक तथा तज्ञ संचालक शशिकांत बांदोडकर यांनी काढले. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित …

Read More »

अमरकोश पठण स्पर्धेस पनवेलमध्ये प्रतिसाद

पनवेल : बातमीदार दादर (मुंबई) येथील महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठानच्या वतीने अमरकोश पठण स्पर्धा गेली 17 वर्षे आयोजित करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी, उच्चारण व पाठांतराचे संस्कार व्हावेत या हेतूने प्रामुख्याने ही स्पर्धा दादर, डोंबिवली आणि पनवेल अशा केंद्रांमध्ये भरवण्यात येते. को. ए. सो. …

Read More »

मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती

पनवेल : वार्ताहर मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पनवेल शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 7) फेरी काढून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’ची पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये प्रभागातील सर्वांनी सहभाग घ्यावा व …

Read More »

महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती

पनवेल : वार्ताहर महामार्गावरील अपघात थांबावेत यासाठी महामार्ग पोलिसांकडून वाहनचालक व प्रवाशांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली असून, हे पोलीस पथक ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करीत आहे. या पथकाने सोमवारी (दि. 6)  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा नाका येथील थांब्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या इको व मिनीडोर चालकांमध्ये जनजागृती केली. …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची साद

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित आयोजित श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन 18 ते 24 डिसेंबरदरम्यान नेरे शांतिवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले होते. युवकांनी ग्रामविकासाबरोबर देशाच्या विकासात सकारात्मक द़ृष्टी ठेवून …

Read More »