पनवेल : बातमीदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल येथील न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीप्रसंगी विशेष सरकारी अभियोक्ता प्रदीप घरत यांना सहाय्य करण्यासाठी यापुढे आता प्रत्येक तारखेस या गुन्ह्यातील सुरुवातीच्या काळात तपास अधिकारी राहिलेल्या पोलिस उपअधीक्षक संगीता अल्फान्सो शिंदे यांना उपस्थित राहण्याची परवानगी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. बिद्रे …
Read More »महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांना प्रशिक्षण
पनवेल : बातमीदार यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा, बाणेर पुणे यांच्या सहयोगाने व त्यांच्या प्रति कर्मचारी रूपये 275 अनुदानातून 20 व 21 डिसेंबर या दोन दिवसांसाठी पनवेल महानगरपालिकेत माहिती अधिकार कायदा या विषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका ही नव्याने स्थापन झालेली असून येथे पूर्वाश्रमीचे नगरपरिषद …
Read More »नेरूळ-उरण रेल्वेच्या कामाला गती येणार
दुसर्या टप्प्यातील खारकोपर ते जासई दरम्यानचा अडथळा दूर उरण : वार्ताहर बहूप्रतिक्षित नेरूळ-उरण रेल्वेच्या दुसर्या टप्प्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारकोपर ते रांजणपाडा दरम्यान असलेल्या खाजगी जमिनीचे संपादन रखडले होते. या प्रकल्पामध्ये सुमारे 67 गुंठे खाजगी जमिन संपादित करावी लागणार आहे. या 67 गुंठे जमिनीचे निवाडे अंतिम …
Read More »महिलांनी आपल्या मनातील भीती दूर करावी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उंचावले मनोबल, महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी आज सर्वच क्षेत्रांत महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना महिलांनी मनातील भीती दूर करावी, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. अबोली रिक्षा महिला संघटनेच्या वतीने पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 19) करण्यात …
Read More »मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; पाण्यासाठी वेळेत उपाययोजना करा, आमदार महेश बालदी यांची विधानसभेत जोरदार मागणी
पनवेल ः प्रतिनिधी शेतकर्यांना देण्यात येणार्या मदतीप्रमाणे उरण भागातील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, त्याचबरोबर धरण व एमआयडीसीच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 19) नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. पुरवणी मागणीवर चर्चा …
Read More »डॉल्फिन किड्स स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा
पनवेल : वार्ताहर सह्याद्री इन्टिट्यूटच्या कामोठे येथील डॉल्फिन किड्स प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस बच्चेकंपनीचा प्रतिसाद लाभला. पूर्व प्राथमिक वयोगटातील मुलांच्या शारीरिक क्षमतेनुसार स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. खो-खो, धावणे, लांब उडी, चमचा गोटी, गायन आदींमध्ये विद्यार्थ्यांची आवड दिसून आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रंगला क्रीडा महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. 18) करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आजपासून पनवेलमध्ये प्राथमिक फेरी
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पनवेल येथील प्राथमिक फेरीला गुरुवार (दि. 19)पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेची पुणे येथील प्राथमिक …
Read More »उरणमध्ये जनआरोग्य ई-कार्ड शिबिर
उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेवतीने व कॉमन सर्व्हिस सेंटर कोप्रोली (सी.एस.सी)च्या स्मिता म्हात्रे यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत ई-कार्ड उपलब्ध करून घेण्याकामी निवड झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 16) व मंगळवारी (दि. 17) या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »सीकेटी विद्यालयात ‘फन फेअर’
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पुर्व प्राथमिक विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या वतीने बुधवारी फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनीे विविध खाद्यपदार्थ तसेच विविध स्वतूंचे स्टॉल लावले होते. सीकेटी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखालील या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper