Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार महेश बालदी यांची दत्त मंदिरास भेट

उरण ः वार्ताहर दत्त जयंतीनिमित्ताने उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नवे पोपुड येथील दत्तवाडी येथील दत्त मंदिरास आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी ओम दत्त ठाकूर महाराज ट्रस्टचे ठाकूर महाराज यांचे सुपुत्र निनाद ठाकूर व ओम दत्त ठाकूर, महाराज ट्रस्टचे ट्रस्टी तथा माजी उपनगराध्यक्ष रमेश ठाकूर …

Read More »

डीएनएस बँकेचा नवीन वास्तूत शुभारंभ

पनवेल ः वार्ताहर डोंबिवली नागरी सहकारी बँक (डीएनएस) पनवेल शहरात गेली 10 वर्षे कार्यरत आहे. या कालावधीत नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच बँकेचा व्यवसाय उत्तम प्रकारे वाढण्यासमदत झाली आहे. बँकेची पनवेल शाखा आता आधुनिक सोयीसुविधांयुक्त (एटीएम किंवा ई-लॉबीसह) अशा तळमजल्यावरील वास्तूत स्थलांतरित होत आहे. त्यानिमित्त बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची तसेच निरनिराळ्या …

Read More »

खारघरमधील रस्ते डांबरीकरण कामाला सुरुवात

नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरमधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली असून या कामासंदर्भात नगरसेविका संजना समीर कदम यांनी खारघरच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर व सिडको अधिकारी तसेच खारघर येथील सर्व नगरसेवक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने कळंबोली-कामोठे सर्व्हिस रोडवरील पथदिवे उजळले

स्त्री शक्ती फाऊंडेशनचा पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर कळंबोली-कामोठे सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूला असलेले पथदिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे त्या ठिकाणाहून ये-जा करताना रात्रीच्या वेळी महिलावर्गाला त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याचप्रमाणे येथे चोरी, लुटमार आदी घटनासुद्धा घडल्या होत्या. यासंदर्भात स्त्री शक्ती फाऊंडेशनने संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्याचप्रमाणे आमदार प्रशांत …

Read More »

बीसीटी विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा

निरोगी शरीरासाठी खेळाबरोबरच व्यायामाची कास धरा -चंद्रकांत घरत उरण : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण तालुक्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उरण द्रोणागिरी नोड परिसरात भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर यश संपादित केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यालयातील …

Read More »

अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्यांसह खाऊचे वाटप

सीकेटी विद्यालयाचे अनोखे दातृत्व पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या माध्यमातून शनिवारी (दि. 7) अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात …

Read More »

विश्वज्योत हायस्कूलमध्ये सूरव्यापी स्पर्धा

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये 6वी वार्षिक सूर व्यापी अंतिम फेरी स्पर्धा शनिवारी (दि. 7) घेण्यात आली. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. स्पर्धेत गट-ए (8ते11वर्ष) मध्ये तीर्थ निर्णय हांडे याचा  प्रथम क्रमांक, गट-बी(12ते14वर्ष) …

Read More »

रिटघर विद्यालयात विविध उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त रिटघर येशील भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 11) विज्ञान प्रदर्शन, विदयार्थीनी समुपदेशन व एनएसएस कॅम्पचे पथनाट्य सादरीकरण झाले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एम. नाईक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 10 वी अखेरच्या  विद्यार्थ्यांनी सहभाग …

Read More »

फुंडे हायस्कूल येथे गायन स्पर्धा

उरण ः वार्ताहर उरण-फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे, तु.ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात  मंगळवारी (दि.10) रायगड विभागीय गायन स्पर्धा अतिशय उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा, कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचालित-रायगड विभागीय गायन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा उरणच्या फुंडे हायस्कूल येथे आयोजित करण्यात …

Read More »

‘माचीप्रबळ’च्या पर्यटकवाढीसाठी आदिवासी बांधवांचे यशस्वी प्रयत्न

पनवेल ः बातमीदार माथेरानच्या मागील बाजूस असलेल्या पनवेल तालुक्यातील माचीप्रबळ गडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक आदिवासींनी एकत्र येऊन पर्यटकवाढीसाठी केलेले प्रयत्न यासाठी यशस्वी ठरले असून पर्यटनस्थळ नसतानाही या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला माचीप्रबळ गड आणि वनाचा विकास व्हावा, यासाठी येथील स्थानिक आदिवासींनी …

Read More »