Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खारघरच्या केंद्रीय विहार सोसायटीमध्ये आग

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरात सेक्टर 12 मधील केंद्रीय विहार सोसायटी मधील सीएच 1  या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना सोमवारी दुपारी 1. 30 च्या सुमारास घडली. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले. शाश्वती सिन्हा (65) या महिला या घटनेवेळी या घरात अडकलेल्या होत्या. खारघर, …

Read More »

रायगड भाजपचे उरण हे उगमस्थान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन, विजयी मेळावा उदंड उत्साहात

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष फारसा नव्हता, परंतु उरणमध्ये महेश बालदी यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी भाजप मजबूत ठेवला होता. त्यामुळे उरण हे रायगड भाजपचे उगमस्थान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयी मेळाव्यात केले. भाजपचा सबका साथ सबका विकास, हा नारा तुम्ही निवडून …

Read More »

हॅण्डबाल स्पर्धेत रायगड तृतीय

पनवेल : प्रतिनिधी हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्रद्वारा 48वी महिला महाराष्ट्र राज्य हॅण्डबाल अजिंक्यपद स्पर्धा पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड संघाने नागपूरचा पराभव करीत तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यभरातून तब्बल 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत सांगली, ठाणे या संघांवर मात करीत रायगड …

Read More »

चिरनेरच्या महागणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी

उरण ः रामप्रहर वृत्त रविवार सुटीच्या दिवशी संकष्टी चतुर्थीनिमित्त चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा महासागर लोटला होता.  गजाननाची रूपे अनेक तशीच त्याची तीर्थस्थळे विविध ठिकाणी वसली आहेत. कोकण भूमीत गणरायाची अनेक स्वयंभू स्थाने आहेत. त्यापैकी रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथे असणारे महागणपतीचे जागृत स्थान सर्वांना परिचित झाले आहे. उरण तालुक्यात असणारे …

Read More »

बारवई यात्रा उत्साहात

मोहोपाडा ः वार्ताहर कार्तिकी एकादशीनंतर येणार्‍या मोक्षदा एकादशीला पूर्वीपासून होणारी बारवई पोयंजे येथील डोंगरमाथ्यावर असणार्‍या विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्ह्यातील चौर्‍यांऐशी गावांची यात्रा मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यात्रेतील पाळणे, थाटलेली दुकाने आदीसह आनंद लुटण्यासाठी लहानग्यांसह तरुणाईंची मोठी गर्दी दिसून आली. बारवई गावची दीड दिवसाची यात्रा ही सर्वांना परिचित असून या …

Read More »

वक्तृत्व स्पर्धेत पूनम सिरसाट प्रथम

उरण ः वार्ताहर गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्यावतीने नावडे येथे आयोजित केलेल्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत येथील छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पूनम सिरसाट (इ.10 वी अ) हिने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही कर्मवीरांचे वारसदार, या विषयावर पूनम सिरसाट हिने केलेल्या भाषणाने …

Read More »

अवैध दारू विक्री विरोधात कारवाईची गरज

उरण ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील खोपडी दारुकांड स्पिरिटकांड याचा इतिहास असताना या दोन्ही दारुकांडात जवळपास 100 हुन अधिक जणांचा बळी गेला होता. आजही रायगड जिल्ह्यासह उरणमधील अनेक गावांत गावठी दारू व देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असून दारुबंदी खाते व पोलीस खाते यांचे आर्थिक हितसबंध असल्याची माहिती मिळत आहे.   …

Read More »

खांदेश्वर व्यापारी असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी खांदेश्वर व्यापारी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये खांदा कॉलनीच्या अध्यक्षपदी नगरसेवक एकनाथ गायकवाड व उपाध्यक्षपदी भास्कर वाय. शेट्टी यांची निवड करण्यात आली. तसेच असोसिएशनच्या नवीन कमिटीमध्ये सचिव बाबासाहेब ठोंबरे, उपसचिव कमलेश पटेल, खजिनदार सुभाष खोमणे, सहखजिनदार मावजी पटेल, सदस्य चनाराम चौधरी, देशमुख मॅडम, अंबावी पटेल, …

Read More »

रानसई आदिवासी वाड्यांवरील रस्त्याची चाळण

पादचारी व वाहनचालकांना करावी लागतेय कसरत खडी उखडलेल्या मार्गाने पायपीट; आदिवासींमध्ये संताप उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाड्यांवरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, पादचारी आणि लहानसहान वाहनचालकांची या रस्त्यातून जाताना कसोटी लागते. मागील चार वर्षांपूर्वी अन्वरशेठ शाबाजकार यांच्या फार्म हाऊसपासून ते खैरकटी वाडी, भुर्‍याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची …

Read More »

ठेवीदारांचे पैसे द्या, जाहीर सत्कार करू!

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी खुले आव्हान पनवेल : रामप्रहर वृत्त विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेच्या समोर उभे राहून ठेवीदारांना एक महिन्याच्या मुदतीत पैसे देण्याचे आश्वासन देऊन त्या मुदतीत पैसे द्यावे. त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे खुले आव्हान आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश …

Read More »