Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

हेटवणे धरण सुधारित योजनेला मान्यता मिळावी

आमदार रविशेठ पाटील यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली. पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रगतिपथावर …

Read More »

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका कंपनीत कारवाई करीत 106 कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. यामुळे खोपोली-खालापूरसह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेे यांनी शुक्रवारी (दि.8) खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. खालापूर …

Read More »

पेणच्या गणेशमूर्तींना मिळाले भौगोलिक मानांकन

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण येथील जगप्रसिद्ध गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाने हे भौगोलिक मानांकन दिले आहे. यामुळे आता पेण येथील गणेशमूर्तींना वेगळी ओळख मिळेल व गणेशभक्तांची फसवणूक होणार नाही. ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या वतीने चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे मानांकन मिळविण्यासाठी देशभरातील …

Read More »

पाली नगरपंचायतीवर भाजपचा मोर्चा; मुख्याधिकार्‍यांना घेराव

पाली : प्रतिनिधी विकासकामांसाठी आलेल्या निधीचा विनोयोग न होणे, त्रयस्थ व्यक्तीचा कामकाजात हस्तक्षेप, पर्यावरण, स्वच्छता व यात्राकर वसुली अशा अनेक कारणांमुळे भाजपतर्फे पाली नगरपंचायत कार्यालयावर सोमवारी (दि.4) मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरूनकर यांना घेराव घालण्यात आला. भाजप सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या …

Read More »

पेणमधील वाशीनाका येथे बिबट्याची कातडी जप्त

वनविभागाची कारवाई; आरोपी फरार पेण : प्रतिनिधी अलिबाग वनविभाग पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुंबई गोवा महामार्गावरील उंबर्डे फाट्याच्या दक्षिणेकडे वाशी नाका, पेण येथे असलेल्या म्हात्रेचाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री होणार होती. त्यानुसार वेगवेगळे पथक तयार करून रविवारी (दि. 12) सायंकाळी 5 वाजता सापळा रचून आरोपीचा …

Read More »

कर्नाळा बँकेची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करा

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल अलिबाग : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याकरिता या बँकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी (दि. 9) संबंधित अधिकार्‍यांना दिले. कर्नाळा बँकतील …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; सोमवारी मतमोजणी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 5) 177 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. सदस्यपदाच्या 3395 व सरपंचपदाच्या 485 अशा एकूण 3880 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी (दि. 6) होणार आहे. रायगडात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, …

Read More »

महाड एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; पाच कामगार जखमी

स्फोटामुळे कंपनीचे नुकसान महाड : प्रतिनिधी महाड एमआयडीसीमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत शुक्रवारी (दि.3) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना एमएमएसीइटीपी. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड …

Read More »

प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणार्‍या जयंत पाटलांनी पक्षनिष्ठा शिकवू नये -खा. सुनील तटकरे

अलिबाग : प्रतिनिधी नेतृत्व बदल झाला असला तरी मी कालही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि आजही आहे. प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलणार्‍यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना लगावला आहे. खासदार सुनील तटकरे गुरुवारी (दि. 2) अलिबाग दौर्‍यावर आले …

Read More »

रायगड जिल्ह्यात 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. यामध्ये महाड तालुक्यात सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात 38 ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, तर 564 सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 177 ग्रामपंचयातींमध्ये निवडणूक होईल. जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. …

Read More »