Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सरसगडाच्या पायर्‍यांवरून घसरून तरुण पडला

स्थानिक व रेस्क्यू टीमच्या मदतीने आणले खाली पाली, खोपोली : प्रतिनिधी सुधागड पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायर्‍यांवरून घसरून रविवारी (दि. 21) सायंकाळच्या सुमारास एक तरुण खाली पडला. त्याचा डावा हात फॅक्चर झाला असून खांदा निखळला आहे व कमरेला मुका मार लागला आहे. स्थानिक तरुण व खोपोली येथील यशवंती हायकर्स टीमने या …

Read More »

बाळगंगा नदी प्रदूषणप्रकरणी उत्तम स्टीलला बंदची नोटीस

कामगारांच्या नोकरीवर गदा; तीव्र संताप खोपोली : प्रतिनिधी जलप्रदूषण केल्याप्रकरणी खालापूर तालुक्यातील उत्तम स्टील कारखाना व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण  मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली नोटीस दिली आहे. त्यामुळे या कारखान्यातील कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नोकरी धोक्यात आल्याने कामगार वर्गातून व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. …

Read More »

मोदी सरकारच्या माध्यमातून देशातील गोरगरीबांचे कल्याण – केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल

महाड, प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित आहेत. देशातील नागरिकांना अन्न-पाणी पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असतानाही आज पंतप्रधान मोदी केंद्राच्या माध्यमातून मोठा वाटा उचलत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्तीमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सोमवारी (दि. 22) केले. रायगड लोकसभा …

Read More »

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्पातील अडथळा दूर

वनजमीन हस्तांतरित करण्यास केंद्राची मंजुरी मुंबई : प्रतिनिधी पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्पाआड येणारे वृक्ष हटवून लवकरच रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या …

Read More »

हरिहरेश्वर येथे आढळलेल्या बोटीचा दहशतवादाशी संबंध नाही; रायगड पोलिसांनी केले स्पष्ट

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर समुद्रकिनारी आढळून आलेल्या बोटीचा दहशतवादाशी कोणताही संबंध नाही, असे रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सागर किनार्‍यावरील रेतीमध्ये ही बोट अडकलेली असल्यामुळे प्रयत्न करूनही बोट किनार्‍यावर घेणे अथवा समुद्रामध्ये नेणे शक्य झालेले नाही. बोटीवरील सर्व साहित्याची डॉग स्कॉड आणि बीडीडीएसमार्फत …

Read More »

ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

माणगाव : माणगाव -पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात कारला भिषण अपघात होऊन कार 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अकोला जिल्ह्यातील वाशीम येथून आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकूण सहा प्रवासी …

Read More »

खोपोलीत काशी होम्स दहीहंडी महोत्सवाचा मानकरी सोमजाई मंडळ

खोपोली : प्रतिनिधी सोमजाई मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने खोपोली शहरातील बहुचर्चित काशी होम्स दहीहंडी फोडून रोख एक लाख 11 हजार व मानाचा चषक पटकावला. विजेत्या गोविंदा पथकाला काशी होमचे विक्रम साबळे, यशवंत साबळे आणि माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात आला. खोपोली शास्त्रीनगर गुरुद्वारा …

Read More »

माणगावात दहीहंडी उत्सव उत्साहात

गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात; सहा-सात थरांपर्यंत सलामी माणगाव : प्रतिनिधी आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आयोजित माणगावात तालुका शिवसेने (शिंदे गट) चा दहीहंडी उत्सव शुक्रवारी (दि.19) पंचायत समिती कार्यालय परिसरात उत्साहात साजरा झाला. या दहीहंडी उत्सवात रायगड जिल्ह्यातील अनेक गोविंद पथकांनी भाग घेऊन लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली. आमदार भरत गोगावले, …

Read More »

वरवठणे गोविंदा पथकाने सात थर लावून फोडली पालीतील लाखमोलाची दहीहंडी

पाली : प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने पाली येथे उभारलेली लाखमोलाची दहीहंडी फोडण्याचा मान वरवठणे येथील श्री चौडेश्वरी माता गोविंदा पथकांने पटकाविला. शुक्रवारी रात्री सात थर लावून या गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली. सुधागड तालुक्यातील पालीमध्ये शुक्रवारी शिवसेना (शिंदे गट) व भाजप पुरस्कृत एक लाख …

Read More »

पाली बस स्थानक नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण दोन वर्षांपासून रखडले आहे. दरम्यान, नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पाली बस स्थानकाच्या नूतनीकणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालीतील एसटी बस स्थानकाची मोडकळीस आलेली जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून …

Read More »