Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

गणेशोत्सव शांततेत व सुरक्षीतपणे साजरा करा -पोलीस निरीक्षक अशोक थोरात

रेवदंडा पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक रेवदंडा : प्रतिनिधी गणेशोत्सव शांततेने व सुरक्षीतपणे साजरा करण्याचे आवाहन रेवदंड्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी नुकताच पोलीस ठाण्यात आयोजीत केलेल्या नगारिकांच्या विशेष सभेत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुरुवारी सायकांळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पोलीस निरीक्षक अशोक थोरात उपस्थितांना …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी होणार प्राथमिक शिक्षकांचे पगार

शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश; शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहेत. 29ऑगस्ट रोजी शिक्षकांचे पगार करण्याचे नियोजन आहे आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे राजिप शिक्षण विभागाने शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला सांगितले. शिक्षकांना भेडसावणार्‍या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांच्या मुद्यावर …

Read More »

कर्जतमध्ये शेकापमध्ये नाराजीसत्र

उमरोलीपाठोपाठ सावेळे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आता उघड होेऊ लागली आहे. पक्षनेतृत्व लक्ष देत नाही आणि कार्यकर्ते वार्‍यावर आले असून पक्षातील निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, तसेच गावोगावी विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसल्याने तालुक्यातील उमरोलीपाठोपाठ सावेळे …

Read More »

“गद्दार म्हणणार्‍याना धडा शिकवू”

आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार भरत गोगावले यांचा पलटवार महाड : प्रतिनिधी आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आजही कायम आहोत, असे असताना आम्हाला गद्दार म्हणणार्‍यांना येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असा पलटवार आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी …

Read More »

कर्जतमधील शेकाप कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

कर्जत ः शेतकरी कामगार पक्षात पदाधिकार्‍यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत, मात्र या नियुक्त्या करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत कर्जत तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्याकडे पाठवून दिले आहेत. त्यामुळे शेकापमधील गटबाजी व नाराजी उघड झाली आहे. नेरळ येथील विविध …

Read More »

कर्जतमधील नवज्योत देशमुख ‘आयर्न मॅन’

कर्जत ः बातमीदार कझाकस्तानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या नवज्योत मारुती देशमुख या क्रीडापटूने आयर्न मॅन किताब प्राप्त केला आहे. नवज्योत हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोटल पाली गावचा सुपुत्र आहे. या स्पर्धेत सलग 3.8 किमी खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणार्‍या …

Read More »

आज दहीहंडीचा थरथराट!

लाखोंच्या बक्षिसांचे लोणी चाखण्यासाठी गोविंदा पथके सज्ज अलिबाग ः प्रतिनिधी लहान मुलांपासून सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण शुक्रवारी (दि. 19) साजरा होत आहे. यानिमित्त उभारण्यात येणार्‍या दहहंडीसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. भाजपच्या वतीने उलवे नोडमध्ये एकूण तीन लाख 55 हजार 55 रुपयांची पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी …

Read More »

पालीतील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली शहरामधील  गुरवआळी व होळीचा माळ येथील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. या चौकातील नामफलकाचे अनावरण नगराध्यक्षा गीता पालरेचा व सेवानिवृत्त सैनिक अतिष सरनाईक यांच्या हस्ते  करण्यात आले. पालीतील गुरवआळी व होळीचा माळ चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी …

Read More »

पत्नीला आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस बिहारमधून अटक

पेण पोलिसांची कामगिरी पेण : प्रतिनिधी पेणमधील वाशीनाका येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या आरोपी पती मोहन रामअवतार यादव (वय 38) याला पेण पोलिसांनी बिहारमधील झांझा, जिल्हा- जमुई येथून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रुपेश चंद्रकांत म्हात्रे (वय 30, रा. सरेभाग, वाशी ता. पेण) …

Read More »

यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आवश्यक -डॉ. कोकाटे मकबूल

मुरूडमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान मुरूड : प्रतिनिधी आपले आयुष्य सफल व यशस्वी बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व शिस्त बाळगणे खूप आवश्यक आहे. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी मुरूड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी …

Read More »