Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

द्रुतगती मार्गावर दोन व मुंबई-पुणे महामार्गावर एक अपघात, दोघांचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 30) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळे अपघात झाले यात एकाचा मृत्यू झाला. तर जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर पहाटेच साडेपाच वाजण्याच्या सुमारास अन्य एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. या तीन अपघातात एकूण दोघांचा मृत्यू व दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान …

Read More »

कोकणातील दुग्ध व्यवसाय दुर्लक्षित

कोकणातील पालखर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने चालणारा दूध व्यवसाय आज जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. याला कारणीभूत प्रस्थापित राजकीय पक्षांचे पुढारी ठरले आहेत. सध्या कोकणातील बंद पडलेल्या दूध डेर्‍यांचे व्यवसाय पश्चिम महाराष्ट्रामधील दूध उत्पादन करणार्‍या डेअरी व्यावसायिकांनी घेतले असून कोकणातील दूध व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ अली …

Read More »

मुरूडमध्ये वाहतूक सुरळीत होण्यासाठी सम-विषम पार्किंग

मुरूड : प्रतिनिधी दोन दिवसांनी गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून, या कालावधीत शहरातील बाजारपेठेत गर्दी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुरूडमध्ये वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे, पोलीस निरीक्षक नितिन गवारे, व्यापारी बँकेचे चेअरमन संदिप पाटील, नगर परिषद कार्यालयीन अधिकारी परेश कुंभार, प्रशांत दिवेकर, …

Read More »

युवा महोत्सवात डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयाचे यश

रोहे : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ अंतर्गत या वर्षीचा युवक महोत्सव 26 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील जेएसएम कॉलेज येथे घेण्यात आला. या महोत्सवातील विविश स्पर्धांमध्ये रोहा तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.  युवक महोत्सवामधील वादविवाद स्पर्धेमध्ये डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयाच्या प्रतीक येलकर व रोहन पाटील यांनी उत्तेजनार्थ …

Read More »

रोह्यात कुंडलिका नदी संवर्धनाच्या जागेत अतिक्रमण; प्रशासकांकडून पाहणी

धाटाव : प्रतिनिधी कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेत दुकानाचे गाळे बांधून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होताच रोहा नगर परिषदेचे प्रशासकांनी सोमवारी (दि. 29) जागेवर जाऊन संबंधितांना अतिक्रमण हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. दरम्यान, नदीसंवर्धन प्रकल्पाच्या जागेचे विद्रुपीकरण थांबवावे, अशी मागणी सिटीझन फोरमने …

Read More »

रानगव्याच्या हल्ल्यात गुराखी जखमी

पोलादपुरातील कुडपण खुर्द येथील घटना पोलादपुर : प्रतिनिधी तालुक्यातील कुडपण खुर्द येथे शनिवारी (दि. 27) दुपारी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर, महाड, अलिबाग आणि आता मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. सचिन रघुनाथ शेलार असे रानगव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. तो शनिवारी …

Read More »

आघाडीत राहिलो असतो, तर तिन्ही आमदार पुन्हा निवडून आलो नसतो -आमदार महेंद्र दळवी

मुरूड तालुका बौद्ध समाज संघाकडून जंगी सत्कार मुरूड : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त राष्ट्रवादीलाच विकासनिधी मिळत होता. त्यामुळे आमच्या आमदारकीला धोका निर्माण झाला असता. त्या आघाडीत राहिलो असतो, तर आम्ही रायगडमधील शिवसेनेचे तिन्ही आमदार पुन्हा निवडून आले नसतो, असे प्रतिपादन शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड येथे …

Read More »

माणगाव कुणबी समाज संघटनेतर्फे गुणगौरव सोहळा, वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी माणगाव शहर कुणबी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 27) येथील कुणबी भवन सभागृहात झाली. तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत गुणवंत विद्यार्थी, कृषिनिष्ठ शेतकरी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या कुणबी बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे …

Read More »

संजयआप्पा ढवळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तळाशेत (इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांना अविष्कार फाउंडेशनच्या रायगड जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे. अविष्कार फाउंडेशनतर्फे दरवर्षी  विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 2022च्या समाजभूषण पुरस्कारासाठी संजयआप्पा ढवळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशनचे …

Read More »

पराग बोरसेंच्या चित्र कार्यशाळेला सिंगापूरमध्ये लाभला उदंड प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी सिंगापूर येथील माय आर्ट-स्पेस, ईस्ताना पार्क या प्रसिद्ध कलादालनामध्ये नुकतीच कर्जतचे विख्यात चित्रकार पराग बोरसे यांची व्यक्तिचित्रणाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दर दिवशी सहा तास या प्रमाणे तीन दिवस ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला भारतीय आणि सिंगापूरकर विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. कार्यशाळेदरम्यान पराग बोरसे यांनी …

Read More »