Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

ताकई रस्त्याचे काम रखडले

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्णावस्थेत असून, त्याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. साजगांव-आडोशी औद्योगिक वसाहत व संपूर्ण  पंचक्रोशीसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या ताकई रस्त्याचा चार किमी भाग खोपोली नगरपालिका हद्दीत येतो. नगरपालिका हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी …

Read More »

गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात

मुरूडमध्ये मागणी वाढली; कुशल कारागिरांची कमतरता अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहेत. मुर्तीकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मुर्तीकार प्रयत्न करत आहेत. यंदा गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे काम वाढले आहे. परंतु कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. मुरूड तालुक्यात …

Read More »

ना. प्रल्हादसिंह पटेल यांची पालीत बाईक रॅली

पाली : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळात लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले. सुधागड तालुक्यातील पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्री श्री बल्लाळेश्वराचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) दर्शन …

Read More »

पोलादपूरच्या सावित्री नदीत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल; नरवीर रेस्क्यू टीमचा उपक्रम

पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग बंद झाल्यानंतर नरवीर रेस्क्यू टिम तर्फे मंगळवारी (दि. 23) पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे-तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची चाचणी घेण्यात आली. या वेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू आणि अ‍ॅडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दीपक उतेकर, सुमित …

Read More »

माणगावमध्ये श्री सांप्रदायाने राबविले स्वच्छता अभियान

माणगाव : रामप्रहर वृत्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने माणगाव तालुका सेवाकेंद्राच्या वतीने सामाजिक उपक्रम सेवेअंतर्गत जुने माणगाव येथील श्री स्वयंभू  संगमेश्वर  देवस्थान परिसरमध्ये  नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री स्वामींच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून  सकाळी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानाकरिता  …

Read More »

शाळेत मीटर नाही, वीज बिल मात्र भरमसाठ

महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार नागोठणे : प्रतिनिधी महावितरणच्या पाली विभागाअंतर्गत येणार्‍या बाहेरशिव (ता. रोहा) येथील प्राथमिक शाळेत वीज मीटर नाही, मात्र विजेचे बील येत असल्याने महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.  रायगड जिल्हा परिषद शाळा रोहा तालुक्यातील बाहेरशिव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोरोना कालावधीत एप्रिल 2021पासून …

Read More »

दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारने केले -केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल

पेण : प्रतिनिधी विविध विकास योजना राबवून समाजातील वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या लोकसभा प्रवासातून ग्रामस्थ संवाद साधून त्या त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्नप्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा

अलिबाग ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) येथे केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहामध्ये आयोजित शासकीय …

Read More »

खालापुरातील अन्य प्रदूषणकारी कारखान्यांचे काय?

प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका गुलदस्त्यात खोपोली : प्रतिनिधी  जलप्रदूषण केल्यामुळे खालापूर तालुक्यातील ‘उत्तम स्टील‘च्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस स्वागतार्ह असली तरी या कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दोन वर्षाचा कालावधी का लागला, याचे उत्तर मिळणे अपेक्षित असून, भू, जल, वायू प्रदुषण करणार्‍या  तालुक्यातील …

Read More »

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनचा तुटवडा

महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून काही औषधे आणि सलाईनचा तुटवडा भासत आहे. यामुळे परिसरातील रुग्णांना पैसे खर्च करून खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधपुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईनपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. …

Read More »