नागोठणे ः प्रतिनिधी नागोठण्याचे सुपुत्र, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृहसचिव तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (92) यांचे शुक्रवारी (दि. 31) अल्पशा आजाराने नरिमन पॉइंट, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कै. प्रधान यांचा मायभूमी या नात्याने नागोठणेशी कायम संबंध होता व आपल्या गावासाठी त्यांनी भरीव योगदानसुध्दा …
Read More »अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन!
माणगाव ः प्रतिनिधी तमाशातील परंपरागत गणपतीचा गण बदलून छत्रपती शिवरायांना वंदन करणारा गण लिहिणारे व रशियाच्या लेनिन चौकात शिवरायांचा पोवाडा गाणारे शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त माणगावात मातंग समाजाच्या वतीने माणगाव एसटी स्टँडमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला मातंग समाजाचे नेते विश्वनाथ तालीमकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन …
Read More »नुकसानग्रस्त शाळांना मदतीचा हात
चंद्रमा एज्युकेशन संस्थेचा उपक्रम पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने सुधागड तालुक्यातील अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शाळांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी हात पुढे सरसावले. ठाण्यातील चंद्रमा एज्युकेशन संस्था व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकाराने सुधागड तालुक्यातील नुकसानग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना नुकतीच शैक्षणिक मदत देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील …
Read More »जपा डोळ्यांचे आरोग्य
आरोग्य प्रहर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गात डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे …
Read More »आदिवासी भागात दुष्काळजन्य स्थिती
अपुरा पाऊस; 25 टक्के भातलावणी शिल्लक कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कशेळेपासून पुढे असलेल्या आदिवासी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे. शेतात पाणी नसल्याने भाताची लावणी पूर्ण झाली नसून प्रामुख्याने आदिवासी भागातील जमीन ही माळवरकस असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकर्यांना पीक …
Read More »रायगडात 391 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 1) 391 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 143, ग्रामीण 37) तालुक्यातील 180, खालापूर 38, महाड 37, रोहा 27, अलिबाग 24, पेण 22, उरण 18, पोलादपूर 11, कर्जत, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड …
Read More »रोह्यातील ‘ते’ कृत्य सामूहिक
आणखी सहा जण ताब्यात; एक अल्पवयीन रोहा : प्रतिनिधीरोह्यातील तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आणखी सहा नराधमांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि. 1) ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यामुळे तांबडीतील 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तांबडी …
Read More »गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना डेडलाइन; 14 दिवस व्हावे लागणार होम क्वारंटाइन
अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणांहून रायगड जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यात दाखल व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना पुढचे 14 दिवस होमक्वारंटाइन रहावे लागणार आहे. या संदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परिपत्रक जारी केले आहे. रायगड जिल्ह्यात 15 हजारांच्या आसपास नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यासह राज्यात …
Read More »लॉकडाऊन काळात तरुणांनी फुलविला भाजीचा मळा
माणगाव : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे शहरातून गावाकडे आलेले चाकरमानी तरुण शेतीमध्ये विविध प्रयोग करून भाजीपाला पिकवत आहेत. शहरात नोकरी-व्यवसाय गमावलेले तरुण गावी शेतीकडे वळत असल्याने भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील, असे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरातून अनेक चाकरमानी नोकरी, व्यवसाय …
Read More »महाडमध्ये जिल्हा परिषद सदस्यावर प्राणघातक हल्ला; 34 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे खाडी विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र सावंत यांच्यावर गुरुवारी (दि. 31) रात्री 10.30च्या सुमारास गावातीलच एका गटाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सावंत जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी हल्लेखोरांच्या विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी कोकरे गावातील 34 …
Read More »