Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूड तालुक्यात 10 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 194वर पोहोचली आहे. यापैकी 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित  37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील बोर्ली येथील पाच, महाळुंगे गावातील …

Read More »

खोपोलीत विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली शहरातील वीजपुरवठा दर मंगळवारी नियमित डागडुजी व दुरुस्ती कामासाठी दिवसभरासाठी खंडित करण्यात येते. तरीही दररोज दिवस-रात्र कोणत्याही वेळेला बत्ती गूल होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेच्या या लपडांवामुळे विद्यार्थी, नोकरदारांसह सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. अगोदरच भरमसाठ वीज बिलांमुळे ग्राहकांचा रक्तदाब वाढला आहे. दुसरीकडे  अवेळी …

Read More »

मुरूड, नेरळमध्ये सफाई कर्मचारी वेतनाविना

मुरूड : प्रतिनिधी – येथील नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांना एप्रिल व मे महिन्यांचे वेतन अद्यापर्यंत न दिल्याने हे कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परस्थितीत इमानेइतबारे काम करूनसुद्धा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मानवाधिकार संघटनेने जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले आहे. …

Read More »

भाजप किसान मोर्चातर्फे बँकेसमोर ठिय्या आंदोलन

शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यासाठी आक्रमक पवित्रा कर्जत : बातमीदार राज्य सरकारने कर्जमाफी घोषित केली, मात्र त्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केले. खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा शेतकर्‍यांना कर्ज देण्यास बँका दिरंगाई करीत असून, अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकर्‍यांना नाहक त्रास देत आहेत. या विरोधात भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. …

Read More »

कशेडी घाटात चालत्या बसमधून चोरी; संशयित अटकेत

पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या एका चालत्या लक्झरी बसमधून प्रवाशांचा ऐवज चोरल्याची घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी धामणदिवी ग्रामस्थांच्या मदतीने रातोरात कोम्बिंग ऑपरेशन करून एका संशयित आरोपीला पकडले. या गुन्ह्यामध्ये अजून पाच आरोपी सामिल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची मुंबई-गुहागर लक्झरी …

Read More »

गणेशभक्तांच्या वाहनांची महामार्ग फुलला

नागोठणे ः कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना संबंधित गावात 10 दिवस क्वारंटाइन होणे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. 12 ऑगस्टपर्यंत गावी जाणार्‍या गणेशभक्तांनाच याचा लाभ घेणे शक्य आहे. बुधवारचा अंतिम दिवस असल्याने आपल्या मूळगावी पोहचण्यासाठी गणेशभक्त रवाना झाल्याने सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्ग ऑटो रिक्षा, कार, जीप, बसेस यांसारख्या वाहनांनी फुलून गेला होता.

Read More »

अन्नदा संस्थेचा आदिवासींना मदतीचा हात

पाली ः प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अन्नदा संस्थेकडून नुकतेच सुधागड तालुक्यातील पावसाळा व दांड आदिवासीवाडीवर धान्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ 900 आदिवासींना मिळाला. जागतिक आदिवासी दिन पालीसह सबंध तालुक्यात विविध लोकोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या महामारीत आदिवासी बांधवांना आपुलकीची साथ व मदतीचा हात देत …

Read More »

पोलादपूर-महाडमध्ये आज रानभाजी महोत्सव

पोलादपूर ः प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या व्रत आणि उपवासकाळात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रानभाज्यांची आवक शहरी भागात होते. त्या पार्श्वभूमीवर महाड उपविभागीय कृषी अधिकारी साळवे यांनी महाड आणि पोलादपूर शहरांमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (दि. 14) सकाळी 9 वाजता पोलादपूर एसटी बसस्थानक आणि महाड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या …

Read More »

पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर उत्कृष्ट तपास पदकाचे मानकरी

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने या वर्षीच्या उत्कृष्ट तपासकार्याबद्दल पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातून केवळ 10 अधिकार्‍यांची केंद्रीय स्तरावरील पदकासाठी निवड झाली असून संपूर्ण देशातून 121 अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने निवडले आहे. पोलीस दलात अधिकारीपदावर रुजू होण्याआधी अनिल घेरडीकर यांनी भारतीय …

Read More »

संत नरहरी महाराज जयंती उत्साहात

अलिबाग ः प्रतिनिधी मुंबई अहिर सुवर्णकार महाकार्यकारिणीतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती डिजिटल वेबनार गुगल मीटच्या माध्यमातून नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. मंगलाताई सिन्नरकर, मुंबई सुवर्णकार महाकार्यकारिणी अध्यक्ष प्रभाकर मोरे, मुंबई उपनगर येथील प्रकाश खरोटे, पुण्याहून नंदकुमार वडनेरे, उर्मिला पिंगळे या वेळी …

Read More »