Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराचे स्मारक होणार की नाही?

नात सूनेचा राज्य सरकारला सवाल कर्जत : बातमीदार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चले जाव आंदोलनात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे मानिवली गावचे गोमाजी पाटील व त्यांचे पुत्र हिराजी हेही हुतात्मे झाले. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराची अवस्था दयनीय असून, ते कोसळू शकते, मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष …

Read More »

शेतकरी मजुरांसाठी शिबिर

कर्जत ः बातमीदार कर्जत आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी मजुरांना पंतप्रधान किसान योजना व जॉबकार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कशेळे येथे आयोजित शिबिरात 130 आदिवासी वाड्यांमधील कार्यकर्ते आपल्या वाडीतील शेतकरी व मजुरांची कागदपत्रे घेऊन सहभागी झाले होते.  प्रत्येक वाडीतील दोन कार्यकर्ते याप्रमाणे 130 …

Read More »

काळ नदी पुलावरील प्रवास धोकादायक!; संरक्षक कठड्यांची पडझड; अपघाताची भीती

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील काळ नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्‍या महत्त्वाच्या अशा मार्गावरील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पानोसे गावाकडे जाणार्‍या वळणावरील काळ नदीच्या पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने या पुलावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. हा …

Read More »

थेरोंडा समुद्रकिनारी मृत व्हेल मासा

रेवदंडा ः प्रतिनिधी थेरोंडा समुद्रकिनारी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत वाहून आलेला व्हेल मासा आढळला असून, त्याचे तुकडे समुद्रकिनारी विस्कटले होते. अनेक दिवस समुद्रात मृतावस्थेत राहिल्याने व्हेल मासा कुजला होता. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. व्हेल मासा अंदाजे 30 ते 40 फूट लांबीचा आहे. समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात कुजलेल्या अवस्थेतील या व्हेल …

Read More »

पराग बोरसे यांच्या चित्रांची हॅट्ट्रिक

कर्जत ः प्रतिनिधी कर्जतचे जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसर्‍या वर्षी पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. बोरसे हे हा बहुमान मिळविणारे एकमेव भारतीय ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे हे 48वे आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन आहे.यंदाही कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची निवड …

Read More »

माणगाववासीयांचा भ्रमनिरास; सत्ताधार्‍यांचे आश्वासन हवेतच विरले; ग्रामस्थांत नाराजी

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगर पंचायतीच्या 10 जानेवारी 2016 रोजी झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध ठळक विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन हद्दीतील ग्रामस्थांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आले होते, मात्र सत्ताधार्‍यांचे हे आश्वासन हवेतच विरले असून, मागील पाच वर्षांत माणगावनगरीत सत्ताधार्‍यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही ठळक विकासकाम मार्गी लावले …

Read More »

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल त्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी दूरध्वनीवरून आभार मानले.पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टी …

Read More »

रायगडात 16 रुग्णांचा मृत्यू; 648 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 648 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 14) झाली, तर दिवसभरात 600 रुग्ण बरे झाले. मयत रुग्णांमध्ये अलिबाग तालुक्यातील पाच, पनवेल व कर्जत प्रत्येकी तीन, रोहा दोन आणि खालापूर, पेण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले …

Read More »

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

अलिबाग : प्रतिनिधीमागील चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. पावसाने रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 14)  एकूण  पर्जन्यमानाच्या 101.77  टक्के पावसाची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.रायगड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार …

Read More »

पीओपी गणेशमूर्ती निर्मितीवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी

आमदार रविशेठ पाटील यांची केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी पेण : प्रतिनिधीप्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्ती निर्मितीवरील बंदी कायमस्वरूपी उठवून पेणसह राज्यातील मूर्तीकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांना आमदार पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पेण …

Read More »