पेण ः प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉक्टर्स, संघ परिवार यांच्या सहकार्याने नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. गुरुवारी गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळच्या सुमारास बालाजी कॉम्प्लेक्स, शीतल विहार, शिवानी संकुल, वास्ट पॅलेस, नगर परिषद चौक येथे कॅम्प …
Read More »चिंताजनक! रायगडात तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू; 391 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 30) 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 391 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 164, ग्रामीण 46) तालुक्यात 210, पेण 39, खालापूर 32, उरण 24, अलिबाग, माणगाव व रोह्यात प्रत्येकी 17 तर कर्जत व महाड प्रत्येकी 15, सुधागड व श्रीवर्धन …
Read More »रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत सुयश
आदिवासी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी पाली ः प्रतिनिधी कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली, संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यातील एकूण चार विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक गुणावत्तेबरोबरच क्रीडा व विविधांगी क्षेत्रातही अग्रेसर …
Read More »जेएसएस रायगडच्या कार्याचे कौशल्य विकास मंत्रालयाकडून कौतुक
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील लोकांना मोफत लिक्विड हॅण्डवॉश बनविण्याचे प्रशिक्षण व कापडी मास्कचे वाटप करण्याचे काम जन शिक्षण संस्थान (जे. एस. एस.) रायगड ग्रामस्थानने केले. त्याची दखल घेऊन कौशल्य विकास मंत्रालयाने जे. एस. एस.चा गौरव केला आहे. जन शिक्षण संस्थान रायगडच्या विद्यार्थी व प्रशिक्षिका यांच्या मदतीने सामाजिक …
Read More »चीननिर्मित वस्तूंवर बहिष्कार टाका; युथ फॉर्च्युनचे तहसीलदारांना निवेदन
मुरूड ः प्रतिनिधी चीन हा बाजारपेठा काबीज करण्यासाठी इतर देशांवर लष्करी दबाव आणून काही भाग आपल्या ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचत आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनमध्ये उत्पादित वस्तू खरेदी करू नये, त्याचप्रमाणे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा यासाठी युथ फॉर्च्युन स्वयंसेवी संघटनेकडून तहसीलदार गमन गावित यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी संघटनेचे …
Read More »प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; प्रशासनास अल्टीमेटम; नुकसानभरपाई न मिळाल्यास साखळी उपोषण
कर्जत ः बातमीदार इथेन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन देणार्या कोदिवले भागातील शेतकर्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली आहे. परिणामी कोदिवले भागातील शेतकर्यांनी प्रशासनाला 15 दिवसांनंतर शेतकरी आपल्या हक्कासाठी आक्रमक होतील, असा इशारा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीतून धुराचे लोट
वडखळसह पेण परिसरातील नागरिक भयभीत पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतून बुधवारी (दि. 29) सकाळपासून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता. हा धूळमिश्रीत धूर असल्याने वडखळ, पेण परिसरात दाट लोट पसरले होते. साधारण लालसर रंगाच्या या धुरामुळे पेणकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियात त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याने …
Read More »सुधागडात बिबट्याचा वावर
पाच्छापूर येथे वासरावर हल्ला पाली : प्रतिनिधीसुधागड तालुक्यातील पाच्छापूर येथे एका बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे 2:30च्या सुमारास घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पाच्छापूर येथील सुरेश गोविंद वरघडे यांना पहाटे त्यांच्या गुरांच्या गोठ्यात बिबट्या आला असल्याची चाहूल लागली. वरघडे यांनी ताबडतोब …
Read More »दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी
कोकण विभाग राज्यात अव्वल मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली. निकालात या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग यंदा अव्वल …
Read More »रायगड जिल्ह्यात 398 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 29) झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 119, ग्रामीण 43) तालुक्यात 162, पेण 54, अलिबाग व महाड प्रत्येकी 31, खालापूर 30, रोहा 21, उरण व कर्जत प्रत्येकी 18, माणगाव 12, श्रीवर्धन आठ, म्हसळा …
Read More »