Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बकरी ईदनिमित्त रक्तदान

पाली ः प्रतिनिधी समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात आणि कृतीतून प्रबोधन घडवितात. नासिर वल्लाद हे इंजिनिअर त्यातीलच एक असून तब्बल 19 वर्षांपासून बकरी ईदनिमित्त ते रक्तदान करीत आहेत. यंदाही बकरी ईदच्या दिवशी त्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या मानवतावादी सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नासिर यांच्या …

Read More »

मोटरसायकलची कारला धडक; तीन जण जखमी

पेण ः प्रतिनिधी वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी गावाजवळ मोटरसायकल व कारची धडक होऊन या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 2) सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास मोटरसायकलस्वार आपल्या मागे एका इसमास बसवून वाशी फाट्याकडून वाशी गावाकडे जात असताना हा अपघात घडला.  या वेळी मौजे वाशी गावच्या हद्दीत वाशी …

Read More »

अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचारी निलंबित

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग ते दादर बसवर ड्युटी करण्यास नकार दिल्याने अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत सेवा सुरू आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद आहे. सध्या अलिबाग ते पनवेल अशी सेवा सुरू आहे. असे असताना रायगड विभाग नियंत्रकानी …

Read More »

कशेडी घाटातून सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या वाहतुकीच्या खोळंब्यानंतर रविवारी सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर प्रवाशांचे नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कशेडी घाटातील कशेडी बंगला येथे रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये कोरोना …

Read More »

निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धनच्या प्रभू विश्वकर्मा मंदिराचे नुकसान

श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराचे फार मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रत सुप्रसिद्ध असलेल्या विश्वकर्मिय कारागिरांचे व सर्व स्तरातील कारागीर वर्गाचे श्रद्धास्थान असलेले विश्वकर्मिय लोहार सुतार समाज ता. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या रायगड विभागीय संघटनेचे प्रभु विश्वकर्मा मंदिर भोस्ते, ता. श्रीवर्धन, जि. रायगड …

Read More »

देशात कोरोनाचे वाढते संक्रमण

रुग्ण संख्येने ओलांडला 17 लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात रविवारी (दि. 2) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 54 हजार 735 नवे रुग्ण आढळून आले, तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 17 लाखांचा टप्पा ओलांडला असून, मृतांची संख्या 37 हजारांच्या वर गेली …

Read More »

मुंबईसह कोकणात जलधारा बरसणार?

पुणे : मुंबईसह कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 6 ऑगस्टपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, मुंबई, ठाणे व उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त प्रभाव जाणवेल. 4 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मान्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे …

Read More »

तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचार्यांना लागण

खोपोली ः बातमीदार – खालापूर तहसील कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात  सापडल्याने इतर कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत. शनिवारी महसूल दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर आणि कर्मचार्‍यांच्या अँटीजन तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उपस्थिती होती. 41 कर्मचार्‍यांची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन …

Read More »

महसूल दिनानिमित्त रक्तदान शिबिर

पेण ः प्रतिनिधी – पेण उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी रक्तदान शिबिर आणि अँटीजन टेस्ट करण्यात आली. रक्तदान शिबिरात 28 जणांनी रक्तदान केले, तर उपस्थितांपैकी 74 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  रोहा येथील नायब तहसीलदार नागावकर यांचे कोरोनामुळे …

Read More »

किसान क्रांती संघटनेचा बागायतदारांना पाठिंबा

मुरूड ः प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या बागायतदारांच्या नारळ-सुपारीला अल्प भाव दिल्याने मुरूड येथील संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला आता किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनीसुद्धा पाठिंबा दिल्याने हे आंदोलन व्यापक होणार आहे. किसान क्रांती संघटनेचे लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव सदस्य असून होणारे आंदोलन विराट स्वरूपात …

Read More »