खोपोली ः बातमीदार – खालापूर तहसील कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने इतर कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत. शनिवारी महसूल दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर आणि कर्मचार्यांच्या अँटीजन तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उपस्थिती होती. 41 कर्मचार्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन …
Read More »महसूल दिनानिमित्त रक्तदान शिबिर
पेण ः प्रतिनिधी – पेण उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल अधिकारी-कर्मचार्यांसाठी रक्तदान शिबिर आणि अँटीजन टेस्ट करण्यात आली. रक्तदान शिबिरात 28 जणांनी रक्तदान केले, तर उपस्थितांपैकी 74 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रोहा येथील नायब तहसीलदार नागावकर यांचे कोरोनामुळे …
Read More »किसान क्रांती संघटनेचा बागायतदारांना पाठिंबा
मुरूड ः प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या बागायतदारांच्या नारळ-सुपारीला अल्प भाव दिल्याने मुरूड येथील संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला आता किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनीसुद्धा पाठिंबा दिल्याने हे आंदोलन व्यापक होणार आहे. किसान क्रांती संघटनेचे लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव सदस्य असून होणारे आंदोलन विराट स्वरूपात …
Read More »उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर, टेक्निशियन दाखल
पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या फार कमी असल्याने त्यासाठी तरतूद व्हावी तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा आडमुठेपणा व अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मेलद्वारे मागणी केली होती. या …
Read More »पर्यटकांवर करडी नजर
पोलिसांचा खडा पहारा; वर्षा सहलींचे बेत फ सले कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील पाणवठे तसेच इतर पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात मौजमजा करण्यासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येदेखील काही हौशी तरुण-तरुणी माथेरानच्या डोंगरात असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येत होते, मात्र पोलिसांनी मागील काही दिवसांपासून येथे चोख बंदोबस्त …
Read More »आम्ही मागून वार करत नाही
शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंना सुनावले अलिबाग : प्रतिनिधीकाही लोक असे आहेत जे मागून वार करतात. आम्ही जे काही असेल ते समोरासमोर करतो. आमचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, असा सूचक इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. शेकापचा 73वा वर्धापन …
Read More »आगरदांडा जेटीवर मच्छीमार करणार आंदोलन
मुरुड : प्रतिनिधी – 1 ऑगस्ट रोजी मासेमारी करण्यास शासनाने परवानगी दिल्याने मुरुडच्या मच्छिमाराने आपल्या बोटी आगरदांडा जेटीला लावल्या तत्काळ मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी त्यांना बोटी लावण्यास मनाई केली. शासनाचे आदेश घेऊन या मग जेटी वापरा असे सांगितल्याने मच्छिमार संतप्त झाले. जेटीवर एकत्र येऊन 4 आगोस्टला मंगळवारी याच जेटीवर हजारो मच्छिमार …
Read More »विश्रांतीनंतर मच्छीमार नौका समुद्रात रवाना
मुरूड : प्रतिनिधीदोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमार नौका पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या आहेत. नव्या हंगामात तरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोकणाला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असून, या अरबी समुद्रात मासेमारी करून सुमारे पाच लाख मच्छीमार आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात, पण सरते …
Read More »तुटपुंज्या मदतीने बागायतदार नाराज
योग्य भाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी व इतर बागायती उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, जे पुढील 10 ते 12 वर्षे भरून निघू शकत नाही. असे असताना राज्य सरकारने सुपारीसाठी 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपये नुकसानभरपाई मंजूर …
Read More »बकरी ईद साधेपणाने साजरी
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाच्या संकटात या वर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदबरोबरच बकरी ईदही शनिवारी (दि. 1) साधेपणाने साजरी केली. मशिदीत केवळ मौलाना व अन्य तीन जणांनीच नमाज अदा केली. अन्य मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा केली. तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडिया व दूरध्वनीवरून ईदच्या शुभेच्छा …
Read More »