Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात 430 नवे कोरोना पॉझिटिव्ह; नऊ रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 31) 430 नव्या कोरोना रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 252 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 225, अलिबाग 64, पेण 49, रोहा 22, कर्जत 20, खालापूर व सुधागड प्रत्येकी 14, उरण नऊ, महाड चार, तळा तीन आणि …

Read More »

भाजपच्या कोरोनाकाळातील कार्य अहवालाचे प्रकाशन

ठाणे : प्रतिनिधी – कोरोना आपत्तीच्या काळात ठाणे शहरातील कानाकोपर्‍यात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत चार महिन्यांत केलेल्या सेवाभावी कामांची जंत्री मांडण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेतील …

Read More »

भाजप कामगार आघाडीच्या कोकण प्रभारीपदी विनोद शहा

पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी प्रदेश संयोजक गणेश ताठे व प्रभारी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच कामगार आघाडीची प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची घोषणा केली असून यामध्ये कोकण प्रभारी व महाराष्ट्र कामगार आघाडी कार्यकारिणी सदस्यपदी रायगडमधून विनोद शांतीलाल शहा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. मागील तीनवर्षांपासून …

Read More »

पाच महिन्यांची एकत्रित वीज बिले

महावितरण कंपनीचा ग्राहकांना ‘शॉक’ अलिबाग : प्रतिनिधीमहावितरण कंपनीने पाच महिन्यांचे वीज बिल एकत्रित पाठवून ग्राहकांना ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ बिले आल्याने महावितरणच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. शंकेचे निरसन होत नसल्यामुळे महावितरण कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादही होत आहेत.कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने मार्च महिन्यापासून टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. …

Read More »

कर्जतमध्ये जुगार अड्ड्यावर धाड

45 जणांना अटक; 38 लाखांचा ऐवज जप्त कर्जत : बातमीदारकर्जत शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांनी धाड टाकून 45 जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. या ठिकाणाहून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि वाहने असा 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये रायगडसह मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे …

Read More »

पेण अर्बन बँकेचे ठेवीदार आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन खालापूर : प्रतिनिधीपेण अर्बन बँकेचे ठेवीदार आपले पैसे मिळविण्यासाठी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून घोटाळ्याविरोधात अविरत लढा देत आहेत, पण उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याने या ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आहे. शासन व प्रशासन अजून किती अंत पाहणार याचा जाब विचारण्यासाठी 7 सप्टेंबरपासून ठेवीदार हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे …

Read More »

विनामास्क फिरणार्यांना मास्कचे वाटप

कर्जत : बातमीदार नेरळ बाजारात मास्क न लावता मोठ्या प्रमाणात नागरिक, ग्रामस्थ फिरत आहेत. त्यांना मास्क वापरण्याची सवय व्हावी म्हणून जनजागृती मोहीम रविवारी (दि. 30) नेरळ व्यापारी फेडरेशनने राबविली. दरम्यान, नेरळ बाजारपेठेत रॅली काढून मास्क वापरण्याचे आवाहन करीत व्यापारी फेडरेशनने मास्कचे वाटप केले. रॅलीमध्ये फेडरेशनचे अध्यक्ष कमलेश ठक्कर, उपाध्यक्ष निलेश …

Read More »

हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांचा उच्छाद

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. 90 टक्के झाडे मोडून पडुन गेली आहेत. त्यामुळे बागायतदारांना नवीन लागवड करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांनी प्रचंड उच्छाद मांडला असून नवीन लागवडीसाठी आणलेली माडाची रोपे माकडांनी फस्त केली आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे हरिहरेश्वर मंदिर बंद आहे. याच परिसरात …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी बंद पडलेल्या टँकरचा मुसळधार पावसात अंदाज न आल्याने दुचाकिची मागून जोरदार धडक बसल्याने रविंद्र ठोंबरे (32, रा. कोपरी चौक, खालापूर)जागीच ठार झाल्याची घटना रविवारी जुन्या मुंबई-पूणे महामार्गावर खालापूर हद्दीत दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र दुचाकिवरून चौकहून पनवेलच्या दिशेने जात  होते. नढाळ गावाच्या हद्दीत बंद पडलेला टँकर …

Read More »

रायगडातील भातपिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव

अलिबाग : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे  रायगड जिल्हयात भातापीकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात पोलादपूर परीसरात निळा भुंगेरा, माणगाव भागात नाकतोडा तर पेण परीसरात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हयात साधारण एक लाख 10 हजार हेक्टर हे भाताचे क्षेत्र आहे. यंदा लावणीची …

Read More »