अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेले जे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांत एकूण 2714 मतदान केंद्रांवर 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 13600 …
Read More »अदाड गावातील कार्यकर्ते भाजपमध्ये
मुरूड : प्रतिनिधी खोटी आश्वासने देऊन कोणतेही काम कधीच पूर्ण न करणे ही शेकापची खासियत आहे. 10 वर्षांपासून एकही विकासकाम शेकापकडून पूर्ण होत नाही म्हणून नाराज असलेल्या उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील अदाड गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा भाजपच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास …
Read More »ई-टॉयलेट्सला महाडकरांची नापसंती ; वापराचे ज्ञान नसल्याने अडचणी
महाड ः प्रतिनिधी महाड नगरपालिकेने महाड व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेल्या ई-टॉयलेट्सला सध्यातरी नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. त्यातच वापराचे ज्ञान नसल्याने, तसेच आत अडकण्याच्या घटना घडल्याने अनेक जण भीतीने याचा वापर करीत नाहीत. त्यातच या ई-टॉयलेट्सची जागादेखील चुकली असल्याचे नागरिक सांगत आहेत. महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानात उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये …
Read More »माथेरानमध्ये पर्यटक तरुणीचे स्वतःवरच वार
कर्जत ः बातमीदार माथेरानमधील एका हॉटेलमध्ये पर्यटक म्हणून आलेली 30 वर्षीय आशा रामकुमार लोध (रा. नेहरूनगर, घाटकोपर, मूळची रहिवासी कानपूर) हिने स्वत:वर धारदार चाकूने वार करून घेतल्याने तिला जखमी अवस्थेत असल्यानेे स्थानिक नागरिक सॅबी रीझारीओ यांनी माथेरान पोलिसांना कळविले. उपचारासाठी माथेरान पोलिसांनी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तिला बी. जे. हॉस्पिटल …
Read More »हृदयदिनी ‘आयएमए’ने जिंकले अलिबागकरांचे हृदय
अलिबाग : प्रतिनिधी जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) रविवारी (दि. 29) अलिबागकर नागरिकांकरिता 45 मिनिटे चालण्याची वॉकेथॉन व्यायाम रॅली आयोजित केली होती. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जागतिक हृदयदिनी ‘आयएमए’ने जणू अलिबागकरांचे हृदयच जिंकल्याचे चित्र शहरातील रस्त्यावर पाहायला मिळत होते. रविवारी सकाळी 7 वाजता क्रीडाभुवन येथून जिल्हा …
Read More »पर्यटकांची संख्या रोडावली
जंजिरा किल्ल्यावर शुकशुकाट मुरूड : प्रतिनिधी सुटीचे दिवस असतानाही सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे एरवी गजबजलेल्या राजपुरी व खोरा बंदरात शनिवार, रविवारी शुकशुकाट व कमालीची शांतता दिसून आली. पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे शिडाच्या बोटींचा धंदा ठप्प झाला आहे. होड्या सज्ज आहेत, परंतु पर्यटक नाहीत असे चित्र पाहावयास मिळत आहे. …
Read More »रायगड जिल्ह्यात देवीचा उदो उदो!
आजपासून नवरात्रोत्सवाची धूम अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामध्ये रविवारपासून (दि. 29) शारदीय नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. सकाळी ढोलताशांच्या गजरात दुर्गामातेचे आगमन झाले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 1294 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नवरात्रोत्सव हा गुजरात राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी महाराष्ट्रातही सार्वजनिक मंडळांमार्फत गरबा नृत्याचे आयोजन …
Read More »वणवे रोखण्याची उपाययोजना पाहण्यासाठी वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी घातले डोंगर पालथे
कर्जत : बातमीदार सगुणा वनसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून वणवे रोखण्याचे काम केले जात आहे. या कामाची माहिती घेण्यासाठी वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी अनेक डोंगर चढून वणवे रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. वन विभागात वेगळे व्हिजन ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून मोहन …
Read More »मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घेतला कर्जत बाल उपचार केंद्राचा आढावा
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सिटीसीमध्ये सध्या एकूण 13 तीव्र श्रेणीतील बालके उपचार व पोषण सेवा …
Read More »औरंगाबाद-मुरूड एसटी बस रस्त्यात बंद
मुरूड : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाची औरंगाबाद-मुरूड गाडी शुक्रवारी (दि. 27) रात्री 11.30 वाजता पेण येथे बंद पडली. या गाडीतील प्रवाशांना मुंबई -मुरूड या निमआराम बसमध्ये बसवण्यात आले, मात्र ती बसही प्रवाशांनी भरलेली असल्याने अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. गिअर पडत नसल्याने औरंगाबाद-मुरूड गाडीचा …
Read More »