Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खोपोलीत काँग्रेसला खिंडार; आजी-माजी नगरसेवक, शहराध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सिलसिला सुरूच असून, खोपोलीतील काँग्रेसचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युअल, नगरसेविका जिनी सॅम्युअल, माजी नगरसेवक महादू जाधव, मधुकर दळवी, शहराध्यक्ष संतोष खुरपुडे यांच्यासह कार्यकर्ते 1 सप्टेंबर रोजी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार …

Read More »

तिघर शाळेतील मुलांचे नाव मंगळावर झळकणार; ‘नासा’च्या उपक्रमात अनोखा सहभाग

कर्जत : बातमीदार नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै 2020मध्ये प्रस्तावित आहे. हे यान रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील तिघर शाळेतील विद्यार्थ्यांची नावे सोबत घेऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील प्रक्षेपण केंद्रातून मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. मानवाचे पाऊल मंगळ ग्रहावर पडण्याअगोदर आपले नाव मंगळावर पाठविण्याची संधी नासा या …

Read More »

प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरण; पोलीस अधिकारी, कर्मचार्यांवर गुन्हा

अलिबाग : प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीची दाखल देऊन राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्षातील सहा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एडीसी श्रीमती अलकनूर, प्रशांत लांगी, स. आ. …

Read More »

नेरळमध्ये महायुती बहुमताने जिंकेल! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार फेरीला प्रतिसाद

कर्जत ः बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय युती मोठ्या फरकाने जिंकेल, असा जबरदस्त विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. नेरळमधील ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्ते लियाकत सहेद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी भाजप …

Read More »

विहीर पडल्याने ऐेन पावसाळ्यात पाणीटंचाई

पोलादपुरातील खोपड गावातील महिलांची वणवण सुरू पोलादपूर : प्रतिनिधी अतिवृष्टीमध्ये खोपड (ता. पोलादपूर) गावातील विहीर पडल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील गोवले ग्रामपंचायत हद्दीतील खोपड गावातील एकमेव विहीर 29 जुलैला झालेल्या अतिवृष्टीत पूर्ण कोसळली असून, त्या विहिरीत असलेला …

Read More »

वावेपोटगे गावात स्वच्छता अभियान

रोहे ः प्रतिनिधी रोहा अलिबाग मार्गावर असलेले वावे पोटगे येथे कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोली येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास कृषी कार्यानुभव कार्यक्र्रमांतर्गत वावेपोटगे (ता. रोहा) गावातील मंदिर परिसरात श्री काळकाई देवी मित्र मंडळाच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविले. या वेळी श्रमदान करून त्यांनी श्री काळकाई देवी व राजूबाई देवी मंदिर …

Read More »

वाकस ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे कमळ फुलले

दोन सदस्य बिनविरोध कडाव : प्रतिनिधी सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून येत कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच भाजपचे कमळ फुलविणार्‍या दोन सदस्यांचे पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा वाकस ग्रामपंचायत प्रभारी रमेश मुंढे यांनी अभिनंदन केले. थेट सरपंच आणि नऊ सदस्यांच्या वाकस ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीत  भाजपच्या …

Read More »

नेरळमध्ये आचारसंहितेकडे दुर्लक्ष

ग्रामपंचायत निवडणूक; 15 रिक्षांवर विनापरवाना ध्वनिक्षेपक, प्रशासन अनभिज्ञ कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या 17 जागांसाठी 31 ऑगस्ट रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी जिकडे बघावे तिकडे बॅनर लावले असून ध्वनिक्षेपक लावून किमान 15 रिक्षा दिवसभर प्रचार करीत असतात. त्यातील एकही वाहन निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन …

Read More »

नेरळ येथे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रचार फेरी

नेरळ : येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, महिला तालुका अध्यक्ष सुगंधा भोसले, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, …

Read More »

सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याची जलवाहतूक सुरू

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजापुरी बंदरात असणार्‍या सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या बोटीची गुरुवारपासून (दि. 29) सुरुवात झाली. पाऊस आणि वार्‍याचा वेग कमी झाल्याने प्रशासनाने या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. 13 शिडांच्या बोटींमधून सदरची प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा 22 एकर परिसरात असून …

Read More »