भडवळवाडीत दोन्ही विहिरी कोरड्या, एक कोसळली कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील भडवळ ठाकूरवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या असून आदिवासी ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करून खाजगी फार्महाऊसमधील पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यात भर म्हणून या वर्षी पावसाळ्यात तेथील एका विहिरीचा कठडा …
Read More »होळीसाठी कोळी बांधव घरी परतले बोटींच्या आकर्षक सजावटीने किनार्यांनाही साज
मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले कोळी बांधव होळी सण साजरा करण्यासाठी घरी परतत आहेत. या वेळी आकर्षक सजावट केलेल्या बोटी किनार्यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे. कोकणातील किनारपट्टी भागात मासेमारी या प्रमुख व्यवसायावर कोळी बांधवांचे जीवन अवलंबून आहे. खोल समुद्रात मासळी पकडून ती मुंबईतील ससून डॉक …
Read More »भारतमाला योजनेतून पर्यटन मार्ग महाबळेश्वर-पोलादपूर-दापोलीला जोडणार
महाड : प्रतिनिधी कोकणातील पर्यटनाला व पर्यटन व्यवसायांना चालना मिळावी यासाठी महाबळेश्वर-पोलादपूर-दापोली या महामार्गाची उभारणी भारतमाला योजनेतून केली जाणार आहे. तसे प्रशासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. याच धर्तीवर आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून महाड-मढेघाट-पुणे या पर्यटन मार्गासाठीही प्रयत्न होत असून, महाडकरांची ही मागणीदेखील लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. महाडचे भूमिपुत्र आमदार …
Read More »उरणच्या बाजारात रंग, पिचकार्या दाखल
उरण : रामप्रहर वृत्त होळी तसेच धुलिवंदनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बच्चे कंपनीमध्ये खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून, बाजारपेठा होळीच्या आगमनासाठी सजल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारच्या पिचकार्या, रंग, मुखवटे अशा वस्तूंची ग्राहकांना भुरळ पडत आहे. होळी, धुलिवंदन, रंगपंचमी हा सण म्हणजे ‘बुरा न मानो होली है’ म्हणत …
Read More »पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करावा
वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी : कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. नागरिकांनी इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षण करावे आणि झाडांचा पालापाचोला, केळीची पाने, गोवर्या याद्वारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले आहे. गेल्या …
Read More »कर्जतमध्ये राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करा
माजी आमदार देवेंद्र साटम यांचे आवाहन कडाव : वार्ताहर : लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण एकजूटीने महायुतीचा खासदार निवडून देऊन कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी शिवसेना, आरपीआयच्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित व एकसंघपणे काम करा आपला विजय कोणीच रोखू शकणार नाही, या …
Read More »रोहा तालुक्यात गावठी दारू जप्त; तिघा जणांना अटक
रोहे ः प्रतिनिधी : तालुक्यात रोहा आणि कोलाड पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकून गावठी दारू आणि ती तयार करण्याचे रसायन मिळून एकूण 10900 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहा तालुक्यातील कोलाड विभागात चिंचवली तर्फे आतोणे या ठिकाणी शुक्रवारी सकाळी कोलाड पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी आरोपी (रा.चिंचवली तर्फे आतोणे, ता. रोहा) …
Read More »मानवनिर्मित वणवे वनविभागाची डोकेदुखी
अलिबाग : प्रतिनिधी : शेती, शिकार आदी कारणांसाठी जंगलात वणवे लावण्यात येतात.या मानवनिर्मीत वणव्यामंध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत आहे. दुर्मिळ वन्यजीवांच्या जाती देखील नष्ट होऊ लागल्या आहेत. अनेक उपाय करूनही वनवे थांबत नाहीत. हे मानवनिर्मित वणवे रायगड जिल्ह्यातील वनविभागची डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षी जंगलात वणवे लागतात. त्यात प्रचंड नकसान होत …
Read More »कबड्डी स्पर्धेत उरण संघ विजेता
श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील देहेन येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पुरुष गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गणेश क्लब उरणने विजेतेपद पटकाविले. विनायक दिवलांग संघ उपविजेता ठरला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य विकास निलकर यांच्या हस्ते झाले. तृतीय व चतुर्थ …
Read More »कर्जतच्या अकादमीचे कराटेत सुयश; 18 स्पर्धकांनी जिंकली 42 पदके
कर्जत : बातमीदार ठाणे येथील कराटे प्रशिक्षक व प्राचीन संरक्षण कलेचे अभ्यासक नासीर मुलानी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे टूर्नामेंटमध्ये कर्जतच्या मुला-मुलींनी विशेष प्रविण्य मिळवत एकूण 42 पदकांची कमाइ केली आहे. कर्जत येथील मेत्ता बुडोकॉन कराटे अकादमीचे प्रशिक्षक सुरज पंडित यांच्या मार्गदर्शनखाली अकादमीच्या 18 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला …
Read More »