महाड : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावरील दासगाव गावाजवळ रविवारी (दि. 7) रात्री सव्वा अकराच्या सुमारास एका ट्रकने टेम्पोला समोरुन ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालक ठार झाला तर दोन प्रवाशी जखमी झाले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दासगाव गावाजवळ रविवारी रात्री मुंबईकडे जाणार्या ट्रक …
Read More »मतदान केंद्रावर आता अत्यावश्यक सेवा उपलब्ध
अलिबाग : जिमाका हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय करण्यात आली आहे, तसेच तेथे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकादेखील नियुक्त करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 108 रुग्णवाहिकादेखील सहज उपलब्ध होतील, अशी माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. …
Read More »नेरळ पूर्व भागातील नाला बिल्डर घशात घालतोय; पावसाळ्यात पाणी घरात घुसणार
कर्जत : बातमीदार नेरळ पूर्व भागातील नैसर्गिक नाल्यात अक्षर बिल्डरकडून मातीचा भराव केला जात असून, त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचून राहणार आहे. त्या नैसर्गिक नाल्यावर असलेली मोरी (साकव) अधिक रुंद करावी अशी मागणी असताना, अक्षर बिल्डरकडून नाल्यामध्ये मातीचा डोंगर उभा करण्यात आला आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतदेखील याकडे दुर्लक्ष करीत …
Read More »धोत्रेवाडीमधील आदिवासींचे पाणी फार्महाऊस मालकाला
कर्जत : बातमीदार तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरींपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खाजगी जमीन मालकाने आपल्या फार्महाऊसमध्ये कुंपण बंद केली आहे. दरम्यान, शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाऊस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत, मात्र त्या वेळी बाजूच्या …
Read More »कर्जतमधील पेठ किल्ल्यावर सापडली ब्रिटिशकालीन तोफ
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यामधील कोथळी गड म्हणजेच पेठ किल्ल्यावर ब्रिटिशकालीन तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेली ही तोफ प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे यांनी कोथळीगडावरील एक तोफ गावकर्यांच्या माहितीवरून शोधून काढली. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या …
Read More »जेनिज ट्युलिपच्या चिमुकल्यांनी धरला ताल
वार्षिक स्नेहसंमेलनात रमले विद्यार्थ्यांसह पालक कर्जत : बातमीदार : एप्रिल महिना उजाडला की शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा असते, पण निकालाच्या दिवशी चक्क सांस्कृतिक कार्यक्रम, ही संकल्पना नेरळमधील जेनिज ट्युलिप या लहान मुलांच्या इंग्रजी शाळेने प्रत्यक्षात आणली. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने गर्दी केली होती. जेनीज …
Read More »अलिबागमध्ये पथनाट्यातून मतदारजागृती
अलिबाग : रामप्रहर वृत्त :प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मतदार राजा जागा हो’ या पथनाट्यातून जनजागृती केली. भारतीय निवडणूक आयोग, रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय …
Read More »सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये बारणे यांच्यासाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन
मनसेचे नैनेश मुंढे भाजपत दाखल कडाव : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप व आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी, तसेच त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भाजपच्या सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सावेळे जिल्हा परिषद गटामधील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि. …
Read More »रायगडात होणार सागरमाला नीलक्रांती; 13 बंदरांचे होणार नुतनीकरण
पेण : प्रतिनिधी वाहतुकीचे इतर पर्याय उपलब्ध झाल्यानंतर दुर्लक्षित असलेल्या सागरी जलवाहतुकीकडे आता केंद्र शासनाने सागरमाला नीलक्रांती प्रकल्पांतर्गत दुर्लक्षित राहिलेल्या बंदरांचा विकास या योजनेतून केला जाणार आहे. 1989 मध्ये सुरू झालेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून देशाच्या एकूण मालवाहू कंटेनर हाताळणीपैकी 55 टक्के कंटेनरची चढ-उतार येथे होते. मालवाहतुकीबरोबर प्रवासी वाहतूक हा …
Read More »डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानने केली कब्रस्थानची स्वच्छता
अलिबाग : प्रतिनिधी : रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यात मुस्लीम दफनभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग तालुक्यातील अलिबाग, थळ, मुशेत, रामराज, देवघर, शेखाचेगाव, रेवदंडा, नागाव, श्रीगाव, चौल, पोयनाड, पेझारी येथील मुस्लीम दफनभूमीं परिसराची स्वच्छता करण्यात आली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या …
Read More »