कर्जत : बातमीदार महिला मतदारांबद्दल स्नेहभाव दाखविण्यासाठी निवडणूक आयोगाने कर्जतमध्ये महिला अधिकारी व कर्मचारी असलेले सखी मतदार केंद्र उभारले होते. तसेच पाळणाघरांमुळे महिला मतदार आज आनंदाने मतदान करून जात होते. निवडणुक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कर्जतमधील अभिनव प्रशालेत सखी मतदान केंद्र निर्माण केले होते. या सखी केंद्रात महिला अधिकारी …
Read More »मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोफत मिल्कशेक; नेरळ तंटामुक्ती आणि संघर्ष समितीचा अनोखां उपक्रम
कर्जत : बातमीदार भरगोस मतदान होण्यासाठी उन्हातून येणार्या मतदारांना नेरळ तंटामुक्ती समिती आणि संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी मोफत मिल्कशेक आणि थंड पाण्याचे वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने मतदारांना दिलासा मिळाला. मावळ लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदान झाले. भर उन्हात अनेक मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे …
Read More »नेरळमध्ये नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
कर्जत : बातमीदार नेरळ टेपआळी येथील जनार्दन शिंदे या तरुणाचा सोमवारी (दि. 29) सायंकाळी शुभ विवाह आहे. तत्पुर्वी अगोदर जनार्दन याने नेरळमधील रायगड जिल्हा प्राथमिक उर्दू शाळेत मतदान करून आपला हक्क बजावला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्यात मावळ मतदार संघात सोमवारी मतदान घेण्यात आले. यावेळी नेरळमध्ये भर उन्हातदेखील मोठा उत्साह …
Read More »कर्जतमध्ये चार मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड
कर्जत : बातमीदार लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत चार ठिकाणी मतदान यंत्रणा बंद पडली. नेरळ येथील मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीन तर सालवड येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार काही काळ ताटकळत थांबून राहिले होते. खोपोली आणि कर्जत शहरातील एका मतदान केंद्रात …
Read More »अंध-दिव्यांग मतदारांच्या मदतीला विद्यार्थी; 130 विद्यार्थ्यांचा सहभाग
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील 343 मतदान केंद्रात 943 अंध-दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदानकेंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले होते. सोमवारी (दि.29)दिव्यांग आणि अंध मतदारांना हे विद्यार्थी मतदानकेेंद्रावर मदत करीत होते. सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी …
Read More »कर्जतमध्ये मतदारांमध्ये उत्साह, कार्यकर्ते शांत
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. सकाळी मतदारांची तुरळक गर्दी होती. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. किरकोळ वाद वगळता कर्जत विधानसभा मतदार संघातील मतदान शांततेत पार पडले. आजच्या मतदानाचे वैशिष्ट्ये म्हणजे …
Read More »कर्जत विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदान
कर्जत : बातमीदार : कर्जत विधानसभा मतदारसंघात काल मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले मतदान लक्षात घेता कर्जत विधानसभा मतदारसंघाची विक्रमी मतदानाकडे वाटचाल झाल्याचे दिसून आले. साधारण 70 टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली असून याचा फायदा खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यापैकी …
Read More »उन्हाचा तडाखा तरीही मतदानाचा धडाका
खोपोली-खालापुरात सरासरी 58 टक्के मतदान खोपोली : प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी खालापूर तालुका व खोपोली नगरपालिका क्षेत्रातील एकूण 192 मतदान केंद्रांवर सोमवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी तीन तास सर्वच मतदान केंद्रांवर बर्यापैकी गर्दी झाली होती, मात्र 12 वाजल्यानंतर गर्दी कमी झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अशीच स्थिती होती. …
Read More »महाडमध्ये जयंती महोत्सव उत्साहात
महाड : प्रतिनिधी : वरंध बौद्धजन सेवा मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 128 वा जयंती महोत्सव नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिभूमीतला मी एक कार्यकर्ता असून विधानसभेत मी प्रतिनिधित्व करतो, याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार …
Read More »डॉ. आंबेडकर जयंती नागोठण्यात उत्साहात
नागोठणे : प्रतिनिधी : बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या विद्यमाने येथील शिवाजी चौकात शनिवारी (दि. 27) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी 9 वाजता बौद्धाचार्य किसन शिर्के, हेमंत जाधव, नितीन गायकवाड, मयूर गायकवाड, विलास कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »