खोपोली शहर भाजप कार्यकारिणी सभेत आवाहन खोपोली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून युतीच्या उमेदवाराला शहरातून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याकरिता भाजपचे खोपोली शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सभा झाली. या सभेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाडी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडात कारवाई अलिबाग : जिमाका आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे भरारी पथकांनी गावठी दारू तयार करण्याच्या ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केल्याची माहिती विभागाच्या रायगड जिल्हा अधीक्षक सीमा …
Read More »विद्यार्थ्यांनी शाळेत फुलवला मळा
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील बार्णे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून फूलझाडांची व भाजीपाल्याची लागवड केली. याद्वारे त्यांनी व्यावसायिक शिक्षणाचा धडा गिरवला आहे. बार्णे शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मोकळ्या जागेत काकडी, शिराळी, घोसाळी, दुधी, माठ, भेंडी, पालक, कोथिंबीर, टोमॅटोच्या रोपांची कार्यानुभव या विषयांतर्गत लागवड केली. त्यांनी या रोपांची देखभाल केली …
Read More »मावळमध्ये शेकापची ताठर भूमिका राष्ट्रवादीला ठरतेय डोकेदुखी
कर्जत : बातमीदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे, मात्र पार्थ यांना शेतकरी कामगार पक्ष सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. पार्थ पवार यांनी प्रामुख्याने उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघात जाऊन शेतकरी …
Read More »महाडमध्ये शांतता समितीची बैठक
महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून येथील तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाची तयारी आणि लोकांनी मांडलेल्या सूचना यावर चर्चा करण्यात आली. महाडमध्ये 19 आणि 20 मार्च रोजी चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्ष साजरा होत आहे. याकरिता संपूर्ण राज्यभरातून भीमसैनिक मोठ्या संख्येने …
Read More »रायगड जिल्ह्यातील मजूर संस्थां अडचणीत
अलिबाग : प्रतिनिधी तीन महिन्याचा कालावधी लोटूनही कोणत्याही मजूर कामगार सहकारी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक निकष पूर्ण केल्याचे अहवाल सादर केले नाहीत. तसेच सहाय्यक निबंधक यांच्या नोटीशींना उत्तरही दिले नाही. त्यामुळे या मजूर संस्थांना कामकाज सुरू ठेवण्यास स्वारस्य राहिलेले नाही, असा अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे रायगड …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकातून निर्माण नगरी जाणारा रस्ता बंद होणार? मध्य रेल्वे प्रशासनाच्या सूचना
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या कर्जत बाजूकडून बाहेर पडण्यासाठी दोन फुटाचा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. मध्य रेल्वे कोणत्याही खासगी संस्थेला असा रस्ता देत नसताना देखील निर्माण ग्रुप ऑफ कंपनीचा बोर्ड नेरळ स्थानकात झळकत आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या असून प्रवाशांनी पादचारी पुलाचा …
Read More »कर्जत तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होणार
कर्जत : बातमीदार शिरसे आणि पाथरज या कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका 24 मार्च रोजी होत आहेत. पाथरजमध्ये 10 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर गेल्यावेळी बिनविरोध झालेल्या शिरसे ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षानंतर प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने तेथील निवडणुकीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी थेट सरपंच …
Read More »जिल्ह्यातील मतदार याद्या अचूक व परिपूर्ण -उपजिल्हा निवडणूक अधिकारी
रायगड : प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या मतदार यादीसंदर्भात आवश्यक त्या दुरुस्त्या व इतर बदल केले असून, बिनचूक व परिपूर्ण यादी तयार केली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली. मतदारांनी कोणत्याही प्रकारे संभ्रम ठेवू नये तसेच मार्गदर्शनासाठी हेल्प लाईन, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी …
Read More »यंगस्टार कुर्डुस मंडळाच्या वतीने सुधागडातील 40 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पाली : प्रतिनिधी कुर्डुस येथील यंगस्टार सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या सौजन्याने नुकताच अडुळसे येथील प्राथमिक शाळेत सुधागड तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवान व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अनंत सोमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती साक्षीताई दिघे, पंचायत समिती सदस्या सविताताई हंबीर, सरपंच सोनल …
Read More »